Health First | ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा | काय फायदे होतात? - नक्की वाचा

मुंबई, ०६ जुलै | बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही सीरीयल्समध्ये खोट्या अश्रूसाठी ग्लिसरीनचा वापर केला जातो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण जेव्हा ग्लिसरीनच्या ब्युटी बेनिफीट्सबद्दल तुम्ही जाणून घ्याल, तेव्हा नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखं काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडे चट्टे, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचं इन्फेक्शन आणि कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधीची तक्रार असो ग्लिसरीनला पर्याय नाही. ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.
जाणून घ्या काय असतं ग्लिसरीन:
ग्लिसरीन (किंवा ग्लिसरॉल) हे एक संयंत्र-आधारित लिक्वीड आहे, ज्याचा शोध एका स्वीडीश रसायन तज्ञाने 1779 मध्ये योगायोगाने एका दुसऱ्या चाचणीच्या दरम्यान लावला. जेव्हा हा तज्ञ ऑलिव्ह ऑईल गरम करत होता. तेव्हा ग्लिसरीनचा शोध लागला. भौतिकरित्या ग्लिसरीन हा चवीला गोड आणि पारदर्शक पातळ पदार्थ आहे. हे पाणी आणि मद्य या दोन्हींमध्ये विरघळू शकते. याचा उपयोग कॉस्मेटीकमध्ये त्वचेसंबंधातील उपाचारासाठी केला जातो. खरंतर शुद्ध ग्लिसरीन हे त्वचेच्या खोलवर जाऊन आर्द्रता शोषून ती डीहायड्रेट करतं आणि वातावरणातील आर्द्रता स्कीनच्या आत शोषून घेतं.
ग्लिसरीन आणि गुलाबपाणी:
तसं तर गुलाबपाणी आणि ग्लिसरीन दोन्ही त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे. पण दोन्ही जर एकत्र करून वापरल्यास जास्त फायदेशीर ठरतं. हे मिश्रण त्वचेला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा, डेड स्कीन, एजिंग, पिंपल्स आणि इतर समस्या दूर होतात. हे मिश्रण ना फक्त त्वचेला कोमल आणि डागविरहीत बनवतं तर त्वचेला हायड्रेटही करत. याच कारणामुळे लोक ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर दोन्ही घटकांचं मिश्रण करून करतात. खासकरून हिवाळ्याच्या दिवसात ग्लिसरीन आणि गुलाबपाणी तुमच्या त्वचेवर कमाल करून दाखवतं.
चेहऱ्यावर कसं वापरावं ग्लिसरीन:
ग्लिसरीन हवं असल्यास तुम्ही सरळ ते चेहऱ्यावर लावू शकता किंवा फेस पॅक / फेस मास्कमध्ये मिक्स करून त्याचा वापर करू शकता. एक्सपर्टनुसार ग्लिसरीन हे शुद्ध रूपात वापरण्याऐवजी इतर घटकांसोबत मिक्स करून केल्यास त्याचा वापर जास्त फायदेशीर ठरतो.
क्लीजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग स्किनकेअर हे तीन मुख्य नियम आहेत. चेहऱ्याला क्लींज केल्याशिवाय त्यावर कोणतंही क्रिम किंवा मॉइश्चरायजर लावू नये. हे तुम्हाला माहीत असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, ग्लिसरीन तुम्ही या तिन्ही रूपात वापरू शकता. चला जाणून घेऊया कसं –
क्लींजरच्या रूपात:
जर तुम्ही रोज त्वचेला क्लींज केलं नाहीतर त्वचेवर धूळीचे थर चढतात. ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणतंही स्कीन इन्फेक्सन होण्याची शक्यता असते. यासाठी आवश्यक नाही की, तुम्ही बाजारात मिळणाऱ्या क्लींजरचाच वापर करावा. तुम्ही नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या क्लींजरचा वापरही करू शकता. जे तुमच्या त्वचेला निरोग ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. ग्लिसरीनपासून बनवलेलं क्लींजर तुम्ही मेकअप, त्वचेवरील घाण, प्रदूषण आणि इतर अशुद्धी दूर करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील. हे तुमच्या त्वचेवरील छिद्र बंद करण्यातही मदत करत.
असा करा वापर –
क्लींजिंग पेस्ट बनवण्यासाठी एक अर्धा चमचा मध, एक चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा केस्टाईल साबण मिक्स करून घ्या. आता ही क्लींजिंग पेस्ट एखाद्या डब्यात ठेवून द्या. मग सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी ही क्लींजिंग पेस्ट चेहऱ्यावर लावून स्वच्छ करून घ्या.
टोनरप्रमाणे करा वापर:
जर तुम्हाला डागविरहीत त्वचा हवी असल्यास तुम्ही ग्लिसरीनला नैसर्गिक टोनरच्या रूपातही वापरू शकता. खरंतर, ग्लिसरीन हे त्वचेच्या पीएच स्तराला संतुलित करण्यात मदत करतं. यामुळे तुमच्या त्वचेला पोषणासोबतच डागविरहीत राहण्यासही हे फायदेशीर ठरतं.
असा करा वापर –
चेहरा चांगला स्वच्छ करून घ्या आणि मग त्यावर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दिवसातून 2 वेळा ग्लिसरीनला तुम्ही टोनरच्या रूपात वापरू शकता.
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ग्लिसरीनचा वापर करावा का?
या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. आता तुम्ही म्हणाल की ग्लिसरीन तर कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी योग्य आहे. तर मग तेलकट त्वचा असणारे कसे वापरू शकतात ? तुमच्या माहितीसाठी ग्लिसरीन हे सर्वात जास्त तेलकट त्वचेवर परिणामी ठरतं. कारण या प्रकारच्या त्वचेला काळजीची खूपच गरज असते. अशा त्वचेवर जास्त काळ मेकअप टीकत नाही. तसंच तेलकट त्वचेवर पिंपल्सही खूप असतात. ज्यामुळे चेहरा वाईट दिसतो. ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याच्या वापराने तुम्हाला तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळेल. हे मिश्रण करून चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावरील एक्स्ट्राचं तेल आरामात निघून जाईल आणि चेहऱ्यावर मस्त ग्लो येईल.
ग्लिसरीन लावण्याचे फायदे:
जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर केल्यास तुम्हाला एक नाही अनेक फायदे होतील. त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्याशिवायही ग्लिसरीनचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया त्याबाबत;
चेहरा उजळण्यासाठी:
ग्लिसरीनसोबत तुम्ही गुलाबजलचं मिश्रण केल्यास ते तुमच्या त्वचेला आर्द्रतेसोबतच उजळपणाही देतं. थंडीच्या दिवसात तुम्ही रूक्ष त्वचेमुळे त्रासला असाल तर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिक्स करून झोपताना तुमच्या त्वचेवर लावा. काही दिवसातच तुमच्या त्वचेचा टोन उजळलेला दिसू लागेल.
ब्लॅक हेड्स हटवा:
जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स असतील तर ग्लिसरीन, मुलतानी माती, बदामची पावडर मिक्स करून त्याचा फेस पॅक बनवून घ्या आणि जवळपास 30 मिनिटांपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवा. जेव्हा सुकेल तेव्हा हलक्या हाताने स्क्रब करा आणि कोमट पाण्याने धूवून टाका.
डागविरहीत त्वचेसाठी:
ग्लिसरीनची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे हे त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करत. जर तुम्ही याचा वापर रोज केलात तर तुमच्यावर चेहऱ्यावर एकही डाग दिसून येणार नाही. जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर लिंबाच सालावर ग्लिसरीन लावून ते चेहऱ्यावरील डागांवर चोळा. डाग हळूहळू कमी होतील.
अँटी एजिंगसाठी:
जर तुम्ही रोज ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर केलात तर तुम्हाला कधीच कोणत्याही अँटी एजिंग प्रोडक्ट्सची गरज भासणार नाही. ग्लिसरीनमध्ये असलेल्या अँटी एजिंग गुणामुळे त्वचेचं पोषण होतं. यामुळे तुमची त्वचा बऱ्याच काळासाठी तारुण्यमय राहते.
डॅड्रंफ दूर करा:
ग्लिसरीनमध्ये असलेल्या अँटी फंगल गुणांमुळे तुम्हाला केसांतील कोंड्यापासून तुम्हाला सुटका मिळण्यात मदत होते. यासाठी ग्लिसरीनमध्ये काही थेंब नारळ किंवा सरसो तेल मिक्स करा. केसांना लावा आणि दोन तासाने धूवून टाका. तुम्हाला दोन आठवड्यातच फरक जाणवेल.
स्प्लीट एंड्सपासून सुटका:
स्प्लीट एंड्सची समस्या तशी तर गंभीर नाही. पण जास्तकरून ज्या महिलांचे केस लांब असतात त्यांना स्प्लीट एंड्सची समस्या असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पपई कुस्करून त्यात थोडं दही आणि दोन थेंब ग्लिसरीन घाला. ही पेस्ट 30 मिनिटं केसांना लावून ठेवा. हा पॅक तुमच्या केसांना देईल चमक आणि स्प्लीट एंड्सपासून सुटकाही होईल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Benefits of glycerin on Face in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं