BHR घोटाळाप्रकणी घडामोडींना वेग | महाजन आणि फडणवीसांचे निकटवर्तीय आ. चंदुभाई पटेल अटकेच्या भीतीने अंडरग्राउंड?

जळगाव ०८ जुलै | बीएचआर घोटाळ्याप्रकरणी एका बड्या नेत्याला अटक होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून आ.पटेल यांचा शोध सुरू असल्याचे समजते. आ.चंदूभाई पटेल यांच्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा देखील दाखल केल्याचे समजते.
बीएचआरप्रकरणी राज्यभरात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी धरपकड केली. जळगावात एकाच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेने भागवत भंगाळे, संजय तोतला व इतर आरोपी यांना अचानक येऊन ताब्यात घेतले. त्यादिवशी विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल यांची देखील चौकशी केली जाणार होती, मात्र ते इंदोरला असल्याचे समजले.
एक पथक इंदोर येथेही गेले होते मात्र आ. चंदुभाई पटेल हाताला लागले नाही. काही दिवसांनी पथक पुन्हा इंदोरला गेले असता मुख्य अवसायक जितेंद्र कंडारे पथकाला सापडला. मागील काही दिवसापासून आ.चंदूभाई पटेल हे नॉट रीचेबल असून ते शिरपूरपासून ते अंडरग्राउंड असल्याचे समजते. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत असल्याचे वृत्त असून लवकरच ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MLA Chandu Patel is not reachable on BHR scam investigation news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं