इंधन दरवाढीतून लोकांच्या खिशावर डल्ला | मुंबईकरांसाठी पेट्रोल प्रति लीटर 107.20 रुपये

मुंबई, १२ जुलै | देशातील वाढती बेरोजागारी आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटाचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत इंधन दरवाढीमुळे आणखी भर पडताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 19 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.20 आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 97.29 रुपयांवर जाऊन पोहोचली. कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे.
काल देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. तर 10 जुलैला पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली होती. सध्याची परिस्थिती पाहता डिझेलही लवकरच शंभरी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल-डिझेल आणि महागाईच्या विषयावरून सामान्य लोकांची पूर्णपणे फसवणूक झाल्याचं चित्रं आहे. मोदी सरकार यावर बोलायला तयार नाही तर राज्यातील भाजप नेते यावरून लोकांपेक्षा मोदींच्या बचावात बोलताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य लोकं अक्षरशः वैतागल्याचं चित्रं असल्याने फडणवीस आणि त्यांचे सहकारी राज्यातील जनतेचं इतर विषयांवर लक्ष कसं वळवता येईल यावरच आदळआपट करताना दिसतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Fuel prices reached on highest level in Mumbai news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं