तत्कालीन फडणवीस सरकारचे अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि माजी मंत्री अडचणीत येतील - नाना पटोले

मुंबई, १४ जुलै | काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. एकनाथ खडसेंचंही राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, असं सांगतानाच तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्यानंतर पुन्हा सापडला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचं राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असं सांगतानाच झोटिंग समितीचा अहवाल वाचला नाही. तो पुढे येईल तेव्हा त्यातील फार्स कळून येईल, असं पटोले म्हणाले.
भाजपवर हल्ला करण्याची जबाबदारी:
माझ्यावर भाजपवर हल्ला करण्याची जबाबदारी दिली आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादीवर टीका करण्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. मी तसे करणारही नाही. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना आमचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर थेट हल्ला करत असतो, असं पटोले यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं.
राज्यपालांना महागाईविरोधात निवेदन देणार:
वाढत्या महागाईच्या विरोधात उद्या गुरुवारी आम्ही राज्यपालांना भेटून निवेदन देणार आहोत. काँग्रेसचे काही मंत्री आणि नेते दुपारी 12 वाजता राज्यपालांची भेट घेतील. हे निवेदन देण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे सायकलवरून जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Congress state president Nana Patole made serious allegations on former Fadnavis govt news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं