Crime Patrol | आरोपपत्र दाखल झाले नसल्याचे कारण देत सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज

मुंबई, १७ जुलै | अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाजे यांना अटक केल्यानंतर 90 दिवसात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. याचाचा आधार घेत वाझेनी आता जामिनासाठी अर्ज केला आहे.
मुंबई पोलीस दलातून बडतर्फ:
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टीलिया इमारतीच्या बाहेर काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला क्राईम ब्रँचचा पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वी वाझेला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्तांकडून सचिन वाझे या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून घटनेच्या 311 (2)(ब) या कलमानुसार वाझे बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे.
सचिन वाझेनं मुंबईतील झोन 1 ते 7 मधून जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात 1 कोटी 64 लाख रुपयांची वसूली बारमधून केली. तर झोन 8 ते 12 मधून 2 कोटी 66 लाख रुपयांची वसुली केली. ही वसुली बार मालकांना एक्ट्रा परवानगी मिळण्यासाठी केली जात होती,असे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. आता अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Suspended Mumbai police officer Sachin Waze has filed a bail plea in special NIA court news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं