प्रदेश भाजप ओबीसी माेर्चाची बैठक | 'राष्ट्रीय' शब्दाआडून पंकजांना डावललं | पर्यायी नेतृत्वाला बळ ? - सविस्तर

मुंबई, २० जुलै | मुंबई येथे सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ झाला. आश्चर्य म्हणजे पक्षात ओबीसींचे नेतृत्व करत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला अनुपस्थित होत्या. पंकजा यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ओबीसी हा भारतीय जनता पक्षाचा मूलाधार आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची लढाई तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दादर येथील “वसंत स्मृती’मध्ये सोमवारी ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री व मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, अॅड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संगमलाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती ओबीसी लढ्याचा सुकाणू दिलेला आहे. मात्र सोमवारच्या बैठकीला हे दोन्ही नेते गैरहजर होते. पंकजा मुंडे यांना ओबीसी माेर्चाच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते अशी माहिती मिळाली.
प्रीतम मुंडे यांना डावलल्याने अस्वस्थ:
पंकजा सध्या पक्षात बॅकफूटवर आहेत. परळीतून विधानसभेला पराभूत झाल्यावर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र ती पंकजा यांच्या ऐवजी वंजारी समाजाचे रमेश कराड यांना देण्यात आली होती. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यातही पंकजा यांची बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी अस्वस्थतेचे संकेत दिले होते.
पंकजा राष्ट्रीय नेत्या म्हणून निमंत्रण नाही:
पंकजा मुंडे यांना बैठकीचे निमंत्रणच पाठवण्यात आले नव्हते,असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मात्र ही बैठक प्रदेश कार्यकारिणीची होती अन् पंकजा या ‘राष्ट्रीय नेत्या’ आहेत, म्हणून त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचे सांगत ओबीसी मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने पळवाट काढली. पंकजा मुंडे यांनी मुंबईत नुकताच समर्थकांचा मेळावा घेतला होता.या वेळी मी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी नेता आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा हेच माझे नेते आहेत, असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा नामोल्लेख टाळला होता, हे येथे उल्लेखनीय.
इतर नेत्यांना बळ:
राज्यात भाजपचा पाया विस्तारण्यासाठी वसंतराव भागवत यांनी ‘माधवं’ (माळी, धनगर, वंजारी) हा फाॅर्म्युला दिला. तो यशस्वी करण्याचे कार्य पंकजा यांचे वडील स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. मात्र सध्या पंकजा यांच्या पक्षातील ओबीसी नेतृत्वाला पर्याय म्हणून इतर नेत्यांना बळ दिले जाते आहे, असा आरोप पकंजा यांच्या समर्थकांचा आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP OBC Morcha meeting no invitation to Pankaja Munde news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं