२०१९ मधील सांगली-कोल्हापुर महापुरावेळी फडणवीस महाजानदेश यात्रेत मग्न होते | भाजप नेत्यांना विसर - सविस्तर वृत्त

मुंबई, २४ जुलै | जोरदार पावसाने कोकणात हाहाकार माजवला आहे. महापुराने चिपळूण पार उद्ध्वस्त झाले. लोक अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत; मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री एका रात्रीत मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही, हे तर पळपुटे मंत्री आहेत, या शब्दात भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना टोमणा मारला.
दुसरीकडे, अतुल भातखळकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा सोडू नका, अशी सूचना मंत्री आणि आमदारांना अजित पवारांनी दिली आहे म्हणे. बहुधा मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी”! करोना काळात देखील मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या मुद्द्याचं भांडवल करून विरोधकांनी रान पेटवलं होतं. त्याच मुद्द्याला धरून आता पावसाच्या संकटासमोर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा टोला विरोधकांनी लगावला आहे.
मात्र या नेत्यांना फडणवीसांचा पूर्व इतिहास माहिती नसल्याचं दिसतंय. कारण ऑगस्ट २०१९ मध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. या महापुरामुळे हजारो लोकांचे संसार देशोधडीला लागले. अनेकांच्या संसाराचा गाडा पाच ते दहा वर्षांनी मागे गेला होता. या परिस्थितीत पिडीतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येत होते. मात्र त्या आपत्तीवेळी तत्कालीन फडणवीस प्रशासन आणि सरकार काही प्रमाणात मागे राहिलं अशी जोरदार टीका माध्यमांतून देखील झाली होती.
त्यावेळी एकाबाजूला सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे भीषण परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजानादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात प्रचार करण्यात व्यस्त होते. मात्र प्रसार माध्यमातून जोरदार टीका सुरु झाली आणि माध्यमातून गांभीर्य समोर येताच फडणवीसांनी महा जनादेश यात्रेचा पहिला टप्पा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. सांगली कोल्हापुरात महापुराने थैमान घातलेलं असताना तुम्हाला गांभीर्य कसं नाही असे प्रश्न माध्यमांनी फडणवीसांना विचारताच त्यांनी सुषमा स्वराज यांच्या मृत्यूचं कारण देत विषयाला बगल दिली. मात्र त्यापूर्वी सांगली कोल्हापूरध्ये किती लोकं मृत्युमुखी पडले होते याचा देखील त्यांना विसर पडला होता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Konkan Raigad landslide BJP leader targeting CM Uddhav Thackeray news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं