मनसे महिला आघाडीच्या विधानसभा निहाय जोरदार बैठका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष विस्तार आणि विधानसभा निहाय बैठका मोठयाप्रमाणावर सुरु असून, त्याला महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ती मनसेसाठी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने जमेची बाजू असल्याचे लक्षात येते. सध्या मनसे सामान्य जनतेच्या संबंधित प्रश्नांना हात घालून लोकांपर्यंत पोहोचत आहेत, तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जात आहेत.
परंतु सध्या मनसेने पक्ष विस्ताराची रणनीती आखताना महिला आघाडीला सुद्धा पुरेपूर महत्व दिल्याचे या बठकीतून दिसून येत आहे. एखाद्या पक्षाची महिला आघाडी जितकी सक्षम तितका पक्ष घराघरात पोहोचतो आणि मतांची आकडेवारी सुद्धा वाढते आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना पक्ष, ज्यांची महिला आघाडी ही इतर कोणत्याही पक्षांच्या तुलनेत उजवी असल्याचा आज पर्यंतचा इतिहास आहे. परंतु महिला कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार करायची असेल तर तितक्याच मोठ्या प्रमाणावर महिला नैतृत्व असणे सुद्धा गरजेचे असते. त्याची काही काळापासून मनसेमध्ये कमी होती.
परंतु मागील काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर विभाग निहाय महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा सपाटा लावल्याने त्याचे सकारात्मक परिणाम प्रत्येक विधानसभा मतदारसंघा निहाय पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदार संघात पुरुष कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्त्यांचे प्रमाण सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे मनसेसाठी हे सुखावणारे चित्र असून, त्याचे आगामी निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसल्यास आश्चर्य वाटायला नको असच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं