जमिनीच्या वारस हक्कासाठी कसा कराल ऑनलाईन अर्ज? | या आहेत स्टेप्स

मुंबई, २७ जुलै | शेतजमीन ज्याच्या नावावर आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचा हक्क मिळू शकतात आणि त्यासाठी शेतजमिनीवर वासाची नोंद करणे आवश्यक असते. अशा प्रकारची वारस नोंद ऑनलाईन पद्धतीने कशी करावी, याबाबत या लेखात माहिती घेणार आहोत.
मृत्युनंतर माणसाला एकच काम करता येते, ते म्हणजे त्याच्या वारसांना वारसा हक्क प्राप्ती करून देणे. ज्या क्षणी माणसाचा मृत्यु होतो त्या क्षणाला वारसांहक्काचे जे कायदे अस्तित्वात असतील ते त्याच्या वारसांना लागू होतात. वारसा हक्क रोखता येत नाही. बाकी सात बारावर वारसांची नावे लावणे हा आपले अधिकार नोंदविण्याचा एक उपचार असतो. एखाद्या व्यक्तीच्या वारसांपैकी कोणाचे नाव अधिकार अभिलेखात (सात बारा ) लिहीले गेले नसेल तर तो दुरुस्त करता येतो. आपल्या पूर्वजांच्या नावावर जमीन वर्षानूवर्षे राहिली तर ती दुर्लक्षीत आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येते. त्यानंतर कायदेशीर किवा बेकायदेशीर मार्गाने आपली जमीन हडप केली जाते. आपले अधिकार कायद्याच्या प्रक्रीया पुर्या करुनच आपण सुरक्षीत करू शकतो. या प्रक्रीया काय आहेत ते आपण या लेखात समजून घेणार आहोत.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
१. वारस नोंदी साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला Mahabhumi.gov. in असं सर्च करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
२. या ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूचा एक सूचना दिसेल. सातबारा दुरुस्ती साठी इ हक्क प्रणाली अशा प्रकारची सूचना दिसते व त्या खाली एक लिंक दिलेली असते.
३. https://pdeigr.maharashtra या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
४. या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पब्लिक डेटा एंट्री नावाने एक पेज ओपन होतं.
५. या पेज वरील प्रोसीड टू लोगिन या पर्यायावर क्लिक केलं की तिथे तुम्हाला आधी तुमचा अकाउंट सुरू करायचा आहे. त्यासाठी क्रियेट न्यू यूजर या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
६. हे केल्यानंतर तुम्हाला न्यू यूजर साइन अप या नावाचा नवीन पेज उघडते.
७. ह्या पेज वर तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव, मधले नाव आणि आडनाव टाकायचा आहे. त्यानंतर लोगिंग डिटेल्समध्ये युजरनेम टाकून चेक अवैलाबिलिटी या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये एक प्रश्न निवडून त्याचे उत्तर द्यायचा आहे.
८. हे माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, तुमचा ई-मेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचे नाव तिथे आपोआप येईल. त्यानंतर सिलेक्ट सिटी मध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचा आहे.
९. त्यानंतर खाली ऍड्रेस डिटेल्स मध्ये घर क्रमांक आणि गल्ली चा नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.
१०. सगळ्यात शेवटी कॅपच्या कोड टाकून तिथे असणारी आकडे किंवा अक्षरे जशीच्या तशी पुढच्या खात्यात लिहायची आहेत. त्यानंतर सेव बटन दाबून सेव्ह करायचा आहे.
११. त्यानंतर या पेजवर खाली रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. प्लिज रिमेम्बर यूजर नेम अंड पासवर्ड फोर फ्युचर ट्रांजेक्शन असा लाल अक्षराचा मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला बॅक या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉगिन करायचा आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. अनिल लॉगिन म्हणायचे आहे.
१२. त्यानंतर डिटेल्स नावाचा एक वेळेस तुमच्यासमोर उघडेल. या पेज वर रजिस्ट्रेशन, एफिलींग, सातबारा म्यु टेशन असे वेगवेगळे प्रकारचे पर्याय दिसतील. याचा अर्थ ती तुम्हाला याच सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
१३. यातल्या सातबारा म्युटेशन वर क्लिक करायचा आहे.
१४. त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होतो. इथे तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
१५. त्यानंतर स्क्रीनवर आपला अर्ज मसुदा जतन केला आहे असा मॅसेज येईल. आणि त्या समोर अर्थ क्रमांक दिलेला असेल, या मेसेज खाली ओके बटनावर क्लिक करायचा आहे.
१६. त्यानंतर मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे. सातबारा वरील खाते क्रमांक टा कणे येथे अपेक्षित आहे.
१७. पुढे खातेदार शोधा या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मयताचे नाव निवडायचे आहे.
१८. एकदा ते नाव निवडले की संबंधित खासदाराच्या नावे असल्या गट क्रमांक निवडायचा आहे.
१९. नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.
२०. त्यानंतर समाविष्ट करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर मग निवडलेल्या खाते धारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळते.
२१. त्यानंतरच्या अर्जदार वारसा पैकी आहे का? असा प्रश्न तिथे विचारण्यात येईल. तुम्ही वारसा पैकी असाल तर होय नसेल तर नाही या पर्याय क्लिक करायचा आहे.
२२. त्यानंतर वारसांची नावे भरा पर्याय क्लिक करायचा आहे.
२३. इथे तुम्हाला वारस म्हणून जी नाव लावायचे आहेत त्यांची माहिती भरायची आहे. त्यात नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव लिहायचे आहे. पुढे धर्म निवडायचा आहे कारण धर्मानुसार वारसा कायद्याचे नियम पाळले जातात. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचा आहे आणि मग जन्मतारीख टाकायचे आहे. त्यानंतर तुमचं वय आपोआप तिथे येईल. पुढे मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिनकोडटाकला की तुमच्या जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव तिथे आपोआप येईल.
२४. पुढे पोस्ट ऑफिस निवडायचा आहे त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचा आहे. पुढे मयताच्या असलेले नाते निवडायचे आहे.
२५. मुलगा, मुलगी, विधवा पत्नी नातूनात, सून जे नात असेल ते निवडायचा आहे. यापैकी ना ते नसल्यास सगळ्यात शेवटच्या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि मग वर्ग 1, वर्ग 2, वर्ग-3 आणि वर्ग-4 मध्ये दिलेल्यांना त्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता.
२६. त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसा संदर्भात भरलेली माहिती दिसेल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचा असेल तर तिथे असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती भरायची आहे. आणि नंतर साठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे. अशा रीतीने सगळ्या भाषांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि कागदपत्र सोडायचे आहेत.
२७. पुढे तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायचे आहे. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याच्या हेतूने रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीच्या 8अ चे उतारे ही जोडू शकता. तसेच एका कागदावर एक शपथ पत्र लिहून ते इथे जोडणारा अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नाव व त्यांचा पत्ता नमूद करणे गरजेचे असतात असते. हे सगळे कागदपत्रे जोडल्यानंतर तिथे फाईल अपलोड चा मेसेज येतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to apply online for land inheritance right information in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं