रायगडमध्ये पुन्हा भूस्खलनाचा धोका | भारतीय भूशास्त्र विभागाकडून भीती व्यक्त

मुंबई, ३१ जुलै | महापूरानंतर महाड परिसरावर आता साथरोगाचे संकट येताना दिसत आहे. पूरानंतर १५ जणांना लेप्टो स्पायरेसीस तर तिघांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. पूरानंतर महाड परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. धान्य कुजल्यामुळे दुर्गंधीही पसरली होती आणि शेकडो जनावरेही मृत होऊन पडली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.
तसेच राज्यात रायगडात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे जीवितहानी झाली असताना पुन्हा असाच धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील ४१३ कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले आहे. पावसामुळे एकूण १,५५५ लोक प्रभावित झाले आहेत.
दरम्यान, पुणेस्थित भारतीय भूशास्त्र विभागाने या भागात पुन्हा भूस्खलनाच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे महाडमध्ये स्थायी मदत शिबिर उभारण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला ५ एकर जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याचा दाैरा केला.
दुसरीकडे, देशात डोंगरापासून ते मैदानी प्रदेशापर्यंत पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे हरियाणातील हथनी धरणातील पाणी साेडल्यामुळे यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. जलस्तर २०५.३४ मीटरवर पोहोचला आहे. त्यामुळे दिल्लीतील अनेक भागांना पुराचा धोका वाढला आहे. प्रशासनाने संपूर्ण भागात अलर्ट जारी केला आहे. नदीकाठावरील लोकांना बचाव शिबिरांत हलवले जात आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: After flood crisis in Mahad again landslide threat in Raigad news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं