मागण्या पूर्ण होईपर्यंत GST भरू नका, मोदी दारावर येतील | मोदींच्या बंधूंची टीका

मुंबई, ३१ जुलै | कोरोना आणि लॉकडाउनमुळे नुकसान झालेले व्यापारी आणि व्यावसायिक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जोरदार पाठिंबा दिला. आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका. आंदोलन तीव्र करा. मग, कुठलेही सरकार असो तुमच्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील असे प्रल्हाद मोदी म्हणाले आहेत.
मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका:
प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधूच नव्हे, तर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात छोट्या आणि असंघटित व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत येत नाही. अशात ठाणे येथील व्यापाऱ्यांनी आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केले. उल्हासनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रल्हाद मोदींनी व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
ठाकरेंसह मोदीही मागण्या मान्य करतील:
व्यापाऱ्यांशी संवाद साधताना प्रल्हाद मोदी म्हणाले, “व्यापाऱ्यांनी आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहावे, की आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरणार नाही. आम्ही लोकशाहीत जगतो गुलामगिरीत नाही.” आपले आंदोलन आणखी तीव्र करा. मग, मुख्यमंत्री असो की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या दारापर्यंत यावे लागेल.
चहावल्याचा मुलगा’ म्हणा:
आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात; ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात’, असंही ते म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: PM Narendra Modi Brother Prahlad Modi slams Modi Govt over GST issue news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं