सांगली दौरा | कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार, मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री

सांगली, ०२ ऑगस्ट | सांगली, कोल्हापूर, कोकण भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढावली आहे. यामुळे नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. आज मुख्यमंत्री पूरबाधित गावांची पाहणी करत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोल्हापूर दौरा केला होता.
सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ज्या क्षणी अतीवृष्टी होणार, संकट येणार हा एक अंदाज आला. तेव्हापासून प्रशासन कामाला लागले. शक्य होईल तिथल्या धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांचे आपण स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 4 लाख नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. जीवितहानी होऊ नये, हा आपला प्रधान्यक्रम होता.’
कटू निर्णय घ्यावे लागणार:
अतिवृष्टी होणार हा अंदाज आला होता. तेव्हापासून सरकार कामाला लागलं होतं. जिथं शक्य होईल. तिथे लोकांचं स्थलांतर केलं जाईल. या पट्ट्यातील काही लाख लोकांचं स्थलांतर केलं आहे. जीवितहानी होऊ नये हे प्राधान्य होतं. अनेकांना घरं सोडून जावं लागलं. हा काही आनंदाचा भाग नाही. पण नदी कुठपर्यंत फुगली होती. अनेकांच्या घरात पाणी गेलं. संसार उद्धवस्त झाले. शेतीचं नुकसान झालं. घराचं नुकसान झालं. आर्थिक नुकसान झालं हे दरवर्षी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावा लागेल. तुमचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमची साथ लागेल. आपण पाण्याच्या पातळी मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाही. दरवर्षी पूर येतो. घरदार उद्धवस्त होतं. पुन्हा संसार उद्धवस्त आणि पुन्हा खर्च होतं… असं आपल्याच राज्यात निर्वासितासारखं राहणं योग्य नाही. पण म्हणून कायम स्वरुपी तोडगा काढू, असंही त्यांनी सांगितलं.
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही:
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘या संकटातून मार्ग काढणारच, किती नागरिकांना मदत करावी लागेल याची माहिती घेतली जात आहे. आपल्याला कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील. मात्र कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे माझे वचन आहे. यासोतबच पण कटू निर्णयालाही तुम्हाला साथ द्यावी लागेल. नाहीतर 2005, 2019 2021 अशी पुरांची मालिका सुरुच राहील. दरवर्षी नुकसान आणि मदत हे चक्र भेदावे लागणार आहे. कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे.’ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: CM Uddhav Thackeray visited Sangli Flood affected area news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं