Special Recipe | पचायला हलका आणि पौष्टिक असा मूग डाळ ढोकळा घरी बनवा

मुंबई ३ ऑगस्ट : बेसन ढोकळा ,रवा ढोकळा किंवा खमण ढोकळा असे ढोकळ्याचे विविध प्रकार आपल्याला खूप आवडतात पण मूग डाळ ढोकळा हा या ढोकळ्यांपेक्षा पचायला हलका आणि पौष्टिक आहे. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे
साहित्य :
* 1 कप मूग डाळ
* 4-5 लसूण पाकळ्या
* 1 इंच आले
* 3-4 हिरव्या मिरच्या
* कोथिंबीर
* 1/2 टीस्पून हळद
* चवीनुसार मीठ
* 1 टीस्पून साखर
* 1 टेबलस्पून तेल
* 1/2 पाउच इनो
* 1 टेबलस्पून तेल तडका देण्यासाठी
* 1 टीस्पून जीरे मोहरी
* 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून
* कढीपत्ता
* 1 टीस्पून तीळ
* 1/4 टीस्पून हिंग
* कोथिंबीर
* खोबरे किस
कृती :
१. मुगाची डाळ धुवून 4-5 तास भिजत घालावी. त्यानंतर पाण्यातून काढून घ्यावे.
२. मिक्सर जार मध्ये डाळ घालून, त्यात, आले, लसूण,मिरची, थोडी कोथिंबीर घालून वाटून घ्यावे. थोडे पाणी टाकून बारीक करावे. त्यानंतर एका भांड्यात वाटलेली डाळ काढून घेवून, त्यात हळद, मीठ, साखर तेल टाकून चांगले फेटून घ्यावे. तो पर्यंत एका बाजूला कढईत पाणी टाकून गरम करावे. तसेच ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे, त्याला आतून तेल लावून घ्यावे.
३. नंतर त्यात अर्धा पाउच, ईनो टाकून किंचित पाणी टाकून एकाच दिशेने फिरवून मिक्स करून घ्यावे.
४. त्यानंतर, तेल लावलेल्या भांड्यात, तयार मिश्रण ओतावे. Tap करून घ्यावे. कुकर मध्ये ठेवून 10-15 मिनिट वाफवून घ्यावे.
५. थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने, कडा सोडवून, कापून घ्यावे.
६. त्यावर टाकायला तडका तयार करण्यासाठी, कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी, मिरची, कढीपत्ता, हिंग आणि तीळ टाकावे. गरम तडका, ढोकळा वर टाकावा.
७. वरून कोथिंबीर आणि खोबरे किस टाकून, garnish करून सर्व्ह करावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Moong dal dhokla recipe in Marathi news update.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं