ज्या राज्यात सत्ता नाही, तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छिते - संजय राऊत

मुंबई, ०५ ऑगस्ट | नियोजित मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.
राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाशी आढावा बैठका ठेवल्या होत्या. त्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा आक्षेप घेण्यात आला होता. तसेच राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नयेत, तो सरकारचा अधिकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री नाहीत, राज्यात दोन सत्ताकेंद्रे करू नका असे अवगत करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले होते.
दरम्यान, ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू इच्छिते. दिल्लीत सध्या काय चाललं? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपालही त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या. काही हरकत नाहीत. दम लागून पडाल तुम्ही, असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Shivsena MP Sanjay Raut criticized Governor visit of flood affected area news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं