मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत: खासदार कीर्तीकर

नागपूर : पंतप्रधान मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदींच नाव घेऊन केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते हे शिवसेनेचे नेते सुद्धा उघड बोलू लागले आहेत.
शिवसेना केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये सहभागी असली तरी केंद्रात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नेहमी दुय्यम स्थान देतात असं म्हटलं आहे. सध्या आम्ही भाजप सोबत असलो तरी भविष्यात मात्र शिवसेना हा अपमान कदापि सहन करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार तसेच पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मांडली.
खासदार गजानन कीर्तिकर सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक तसेच मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी दिल्लीतील वास्तव आणि भावना कार्यकर्त्यापुढे मांडत असताना हा खुलासा केला. सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खासदार गजानन कीर्तीकर विदर्भातील अनेक मतदारसंघांना भेट देणार आहेत.
पुढे मेळाव्यादरम्यान त्यांनी सांगितलं की, मोदींच्या या एककल्ली कारभाराचा केवळ शिवसेनेलाच नव्हे तर अकाली दल, टीडीपी या सरकारमधील प्रादेशिक पक्षांनाही आला आणि म्हणूनच टीडीपी अखेर सरकार बाहेर पडले. मित्रपक्षांना दुय्यम वागणूक सहन होत नसल्यानेच प्रादेशिक पक्ष भाजपपासून वेगळे होत आहेत. त्यामुळे आगामी २०१९ ची निवडणूक भाजपसाठी फार कठीण असल्याचं मत व्यक्त करताना आता मोदी लाट केव्हाच संपली आहे असं विधान केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं