संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली वारी | संजय राऊत-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

मुंबई ०८ ऑगस्ट | शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. शिवसेना युपीएचा भाग नाही. मात्र, दिल्लीत राहुल गांधी आणि राऊत यांच्यात जवळकी वाढलेल्याचे चित्र दिसून आले आहे.
उद्धव ठाकरेंसोबत राजकीय चर्चा:
संजय राऊत-उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. ‘या भेटीत पक्ष संघटना यावर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात घटनात्मक माहिती अशोक चव्हाण सगळ्यांना देणार आहेत. संसदेत मराठा आरक्षण घटनात्मक चर्चा मागणार आहोत. दिल्लीत होत असलेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींवरही या बैठकीत चर्चा झाली’, अशी माहिती राऊतांनी दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ‘राहुल गांधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेण्यात उत्सुकत होते. त्याबाबतही त्यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या. जे शिवसेनेने केले ते योग्य केले. त्याचा मालकी हक्क कुणाकडेही नाही. 2024 मध्ये युतीच्या प्रश्नांवर जी काही चर्चा झाली आहे त्याची माहिती मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेन’, असे राऊत यांनी यावेळी राहुल गांधी यांना सांगितले होते. त्यानुसार आज राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा तपशील सांगितला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Shivsena MP Sanjay Raut meet CM Uddhav Thackeray over Delhi parliament session news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं