लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची मुंबईमध्ये महत्वाची बैठक

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये महत्वाची बैठक आयोजित केली आहे. स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच नालासोपाऱ्यात एटीएस’ने हस्तगत केलेल्या स्फोटकाप्रकरणी सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात उद्या सकाळी अकराच्या सुमारास ही महत्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्याला पक्षातील प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, गणेश नाईक तसेच जयदत्त क्षीरसागर आणि इतर सर्व महत्वाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच सनातन संस्थेशी संबंधित व्यक्तींची अटकसत्र सुरु असून त्याचा सुद्धा आढावा घेऊन पक्ष त्यासंबंधित भूमिका स्पष्ट करू शकते असं सांगण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं