Health First | कांजण्या येणे एक संसर्गजन्य रोग | जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

मुंबई, १५ ऑगस्ट | कांजण्या हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. या आजाराची लागण प्रामुख्याने लहान मुलांमध्ये होताना दिसते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या हा आजार कशामुळे होतो आणि याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊ. कांजण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ, रुग्णाची दूषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडीत पाण्याच्या संपर्कात आल्याने दुसऱ्या व्यक्तीला कांजण्याची लागण होऊन आजार पसरत जातो.
याची काही प्रमुख लक्षणे आहेत:
शरीरात वायरस ची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यासाठी साधारण ७ ते २१ दिवस लागू शकतात. काही लक्षणे अशी असतात जसे की ताप येणे, सर्दी किंवा खोकला होणे, डोकेदुखी, भूक मंदावणे आणि ही लक्षणे दिसू लागली कि १/२ दिवसातच अंगावर लाल रंगाचे पुरळ येण्यास सुरुवात होते. हळुहळू ठिकठिकाणी काळसर डाग दिसू लागतात. त्यानंतर काही दिवसात कांजण्या हा आजार बरा होतो आणि डाग सुद्धा नाहीसे होतात.
वरील लक्षणे जाणवू लागल्यानंतर एक किंवा दोन दिवसात अंगावर लाल किंवा गुलाबी रंगाचे पुरळ (फोड) येण्यास सुरवात होते. पुरळ आलेल्या ठिकाणी खाज सुटत असते. त्यानंतर पुढील पाच ते सात दिवसात त्या पुरळात पाणी व पू धरतो. पुढे ते फोड फुटतात व त्याठिकाणी काळसर डाग दिसू लागतात. त्यानंतर काही दिवसात कांजिण्या आजार बरा होतो व त्वचेवर आलेले डागही नाहीसे होतात.
यावर उपचार म्हणून डॉक्टर्स ताप आणि खोकला कमी करण्याचे औषधे देतात . याशिवाय जंतुनाशक क्रीम सुद्धा देतात. १//२ आठवड्यात हा आजार बरा होतो. हा आजार लवकर बरा व्हावा म्हणून रुगणाने योग्य ती विश्रांती घ्यावी, काही दिवस बाहेर जाऊ नये, चक्कर किंवा पुरळ डोळ्यांच्या ठिकाणी येत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. या आजारात आहार हलका ठेवावा. मऊ वरणभात, उसळ, दुधाचे पदार्थ, मासे यांचा समावेश आहारात करू शकता . सफरचंद, केळी, खरबूज अशी फळे खाऊ शकता.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Chickenpox symptoms in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं