भाजपाची जन आशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाव दुप्पट करायला आहे का? - नाना पटोले

मुंबई, १७ ऑगस्ट | भाजपाची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपाने लोकांना फसवले. आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढता, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला लगावला. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पटोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जातीनिहाय जनगणना काँग्रेसची जूनी मागणी:
लोकांशी खोटं बोलून भाजपाने सत्ता मिळवली आणि महागाई केली. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी ही काँग्रेसची जुनी मागणी आहे. मी विधानसभा अध्यक्ष असताना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव पारित करून घेतला, असल्याची आठवण त्यांनी करून दिली. ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना फसणवीस सरकारने ओबीसींना फसवण्याचे काम केल्याचा पलटवार नाना पटोले यांनी केला.
रावसाहेब दानवेंवर टीका:
अमर, अकबर अँथनीचं हे सरकार आपापसातील भांडणातून पडेल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटल होतं. यावर बोलताना म्हणाले की, अमर, अकबर अँथनी या तिघांनी लोकांना न्याय दिला म्हणून हिट झाला. आम्हीही लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. मात्र केंद्र सरकारच पाण्यात बुडुन डूबणार असल्याचं ते म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Congress state president Nana Patole criticized BJP Jan Ashirwad Yatra news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं