लवासा प्रकल्पाची राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका, दिवाळखोरीच्या वाटेवर?

पुणे : लवासाला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांनी लवासा प्रकल्प कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर एक याचिका केली होती. लवासा विरुद्धची ती याचिका लवादाने दाखल करून घेतल्यामुळे ‘एचसीसी’ने तशी माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.
त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी अर्थात एचसीसी प्रवर्तित ‘लवासा’ हा मोठा प्रतिष्ठित प्रकल्प आता खरोखरच दिवाळखोरीच्या वाटेवर आहे का या काळजीने गुंतवणूकदार त्रस्त झाले आहेत. यासंबंधित निकाल कधी यायचा तो येईल, परंतु तत्पूर्वी मोठ्या आशेने गुंतवलेला पैसा बुडण्याच्या भीतीने अनेकांनी आर्थिक गुन्हे विभागाकडेही दाद मागण्याचे ठरवले आहे.
अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा आणि आधुनिक सुखसोयींनी परिपूर्ण तसेच निसर्गाच्या सानिध्यात वसलेला प्रकल्प पर्यटकांच्या सुद्धा आकर्षणाचा विषय होता. परंतु तोच प्रकल्प आता दिवाळखोरीच्या गर्तेत अडकल्याने अनेकांनी दुःख सुद्धा व्यक्त केले आहे. लवासा प्रकल्प पुण्याची शान म्हणून महाराष्ट्रात परिचित झाला होता.
लवासा प्रकल्पात सर्वाधिक हिस्सा हा हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचा असून त्यांचेकडे ६८.७ टक्के भांडवली हिस्सा आहे. तर अवंता ग्रुपचा १७.१८ टक्के, वेंकटेश्वर हॅचरिजचा ७.८१ टक्के आणि विठ्ठल मणियार यांचा ६.२९ टक्के या प्रमाणात हिस्सेदारी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं