काय बोलावे याचे भान राहत नसेल तर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे - गुलाबराव पाटील

मुंबई, २४ ऑगस्ट | नारायण राणे हे गरिमा नसलेले भूत आहे. त्यांना काय बोलावे, याचे भान राहत नसेल तर ठाण्यातील वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे. मला तर त्यांची कीव येते’, अशी शब्दांत शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
काय बोलावे याचे भान राहत नसेल तर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करून शॉक द्यायला पाहिजे – Gulabrao Patil reaction after controversial statement against CM Uddhav Thackeray :
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कोकणातील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या शब्दांत टीका करताना कानाखाली लगावण्याची भाषा केली होती. राणेंच्या या वक्तव्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
नारायण राणेंना लक्ष्य करताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, तरीदेखील ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. त्यांना काय बोलावे? याचे भान नसेल तर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे. ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा माहिती असायला हवी. पण तरीदेखील ते असे वक्तव्य करत आहे. त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये फक्त दाखल करायला नको, तर शॉकसुद्धा द्यायला हवेत. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीपदी ही ते होते. त्यांच्याप्रमाणे शरद पवार, विलासराव देशमुख हेदेखील मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळातही विरोधी पक्ष होते. मात्र, त्या विरोधी पक्षांना एक प्रतिष्ठा होती. मात्र, नारायण राणे हे प्रतिष्ठा नसलेले भूत आहे. त्यांच्या अंगात चुडेल घुसली की काय? असे मला वाटते. त्यांना एखाद्या भानामतीच्या भक्ताकडे नेऊन त्यांच्या अंगात काय घुसले आहे ते पाहिले पाहिजे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Gulabrao Patil reaction after controversial statement against CM Uddhav Thackeray news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं