पेट्रोल व डिझेल अजून महागले, महागाईत भर पडण्याची शक्यता

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ अजूनच अफाट होत असल्याने सर्व सामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. त्यामुळे महागाईत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ३१ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर ४४ पैशांनी महागले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी रुपयाची घसरण आणि कच्चा तेलाच्या दरात होणारी वाढ हीच या मागील मूळ कारण आहेत. परंतु त्यामुळे महागाईत अजून वाढ होण्याची शकता आहे. इंधन वाढीचा आढावा आधी प्रति महिना घेतला जायचा तो आता प्रति दिन घेतला जातो आणि त्यानुसार नवे दर लागू केले जातात आणि त्यामुळे सामान्य लोकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
आज सोमवारी इंधनाच्या दराने मुंबईमध्ये विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोलला ८६. ५६ रुपये तर डिझेलला ७५. ५४ रुपये ग्राहकांना द्यावे लागत आहेत. केवळ एका आठवड्यात झालेली ही चौथी इंधन दरवाढ आहे. त्यामुळे देशाच्या प्रमुख शहरांमध्ये म्हणजे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या पेट्रोल व डिझेलच्या दरामुले ग्राहकांना सर्वाधिक फटका बसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं