अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट? | CBI नं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, २९ ऑगस्ट | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता खुद्द सीबीआयनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट?, CBI नं दिलं स्पष्टीकरण – CBI clarification over report viral on social media about Anil Deshmukh clean chit :
सीबीआयने प्रतिक्रिया देताना काय म्हटलं?
सीबीआयनं महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि इतर अज्ञात लोकांच्या विरोधात नोंदवलेल्या प्रकरणाबाबत अनेक मीडिया प्रश्न प्राप्त झाले आहेत. हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांच्या आधारे या प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकरणाने चौकशीदरम्यान गोळा केलेले पुरावे आणि कायदेशीर मत यावर आधारित नियमित केसची नोंदणी करण्याचे निर्देश दिले. सीबीआयने 21.04.2021 रोजी नोंदवलेली एफआयआर 24.04.2021 पासून सीबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असं म्हटलं आहे.
प्राथमिक अहवालात क्लीनचिट?
तसंच उपअधीक्षक आर.एस. गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशमुख यांच्याविरुद्ध एकही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे आणि म्हणूनच चौकशी बंद करण्यात येत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाली असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: CBI clarification over report viral on social media about Anil Deshmukh chit cheat.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं