महागाई-गॅस उच्चांकावर | राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट

पुणे, ०४ सप्टेंबर | एनसीपी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत.
महागाई-गॅस उच्चांकावर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट – NCP women’s wing protest against inflation in India :
रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वातील सिटी पोस्टाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. यावेळी पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवत देशातील सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती. याच प्रेमाखातर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पंतप्रधानांना रक्षाबंधनाचं आणि महागाईचं रिटर्न गिफ्ट म्हणून शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत. या आंदोलनाची सुरुवात पुणे येथे प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अच्छे दिनाची खोटी स्वप्नं दाखवून जनतेच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या या भावाला महागाईचे प्रतिक म्हणून शेणाच्या गोवऱ्या महिलांनी राज्यभरातून भेट म्हणून पाठवल्या आहेत, असं चाकणकर यांनी सांगितलं.
महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या पंतप्रधानांनी उज्वला गॅस योजना आणली. परंतु फक्त योजना आणून पोट भरत नसतं. दर 15 दिवसांनी स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा दर वाढतोय. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली, त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा ‘चुलीकडे चला’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असा संताप चाकणकर यांनी केला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: NCP women’s wing protest against inflation in India.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं