५ राज्यांमधील विधानसभा निवडणुका | भाजपकडून पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर | फडणवीसांचाही समावेश

नवी दिल्ली, ०८ सप्टेंबर | पुढील वर्षी उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वात महत्वाच्या अशा उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने प्रधान यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांना यूपीमध्ये तैनात केले आहे. तर, पंजाबची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आली आहे.
५ राज्यांमधील विधानसभा निवडणुका, भाजपकडून पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर – BJP appointed Prabhari for 5 states upcoming Assembly Elections :
भारतीय जनता पक्षाने प्रधान यांना उत्तर प्रदेशात प्रभारी केले आहे, तर अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, सरोज पांडे, शोभा करंदजले, कॅप्टन अभिमन्यू, अन्नपूर्णा देवी आणि विवेक ठाकूर यांना सह-प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाबमध्ये शेखावत महत्त्वाची जबाबदारी घेतील आणि त्यांच्यासोबत हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा असतील. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उत्तराखंडचे मुख्य प्रभारी असतील. लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी सिंह सह-प्रभारीच्या भूमिकेत असतील. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मणिपूरमध्ये प्रभारी असतील.
आगामी वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपाने आता कंबर कसली आहे. मार्च-एप्रिल-मे या तीन ते चार महिन्यांमध्ये या निवडणुका होतील. त्यासाठी भाजपाने पदाधिकारी आणि जबाबदारी वाटपामध्ये फेरबदल केले आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP appointed Prabhari for 5 states upcoming Assembly Elections.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं