भाजपाने शिवसेनेला युतीत भरपूर त्रास दिला | त्यामुळे पुढची २५ वर्षे शिवसेना युती करणार नाही - आ. अमोल मिटकरी

पारनेर, १७ सप्टेंबर | सत्ता न मिळाल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणेंपासून चंद्रकांतदादांपर्यंत सत्ताबदलाची भविष्यवाणी व्यक्त करत आहेत. मूळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेले भावी सहकार्यांचे वक्तव्य हे भाजपासाठी नसून इतर एखाद्या जुन्या सहकार्याबद्दल होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दिले आहे.
भाजपाने शिवसेनेला युतीत भरपूर त्रास दिला, त्यामुळे पुढची २५ वर्षे शिवसेना युती करणार नाही – NCP MLA Amol Mitkari reply on Raosaheb Danve’s statement on CM Uddhav Thackeray :
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या विकासनिधीतून सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दानवे व्यासपीठावर असल्याने माध्यमांनी बाऊ केला:
मुख्यमंत्र्यांचे अनेक सहकारी आहेत. मात्र रावसाहेब दानवे व्यासपीठावर असल्याने पत्रकारांनी याविषयावर चर्चा केली, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. भाजपाने शिवसेनेला भरपूर त्रास दिलेला आहे. त्यामुळे किमान पुढची पंचवीस वर्षे शिवसेना युती करणार नाही. महाविकास आघाडी सरकार पुढची पंचवीस वर्षे टिकणार आहे आणि त्यातून नैराश्याने भाजपाचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत, असे मिटकरी यावेळी म्हणाले. नारायण राणे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकरांना भीती आहे की आपल्या तंबुतील आमदार फुटून जातील, म्हणून वारंवार सरकार बदलण्याची भविष्यवाणी ही नेतेमंडळी करत असतात, असा आरोप मिटकरी यांनी केला.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: NCP MLA Amol Mitkari reply on Raosaheb Danve’s statement on CM Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं