Mahant Narendra Giri Death | महंत नरेंद्र गिरीमृत्यू प्रकरणातील सुसाईड नोट हाती | काय लिहिलंय?

प्रयागराज, २२ सप्टेंबर | अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि बाघंबरी मठाचे महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर मठात राहणाऱ्या सेवादार आणि शिष्यांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मठात उपस्थित असलेले शिष्य बबलू सांगतात की, रविवारीच महंत नरेंद्र गिरी यांनी गव्हामध्ये ठेवण्यासाठी सल्फास गोळ्या मागवल्या होत्या. मात्र, खोलीत सापडलेली सल्फास बॉटल उघडलेली नव्हती. त्याच वेळी, एका शिष्याने सांगितले की कपडे लटकवण्यात अडचण येतेय असे सांगत महंतांनी दोन दिवसांपूर्वी नवीन नायलॉन दोरी मागवली होती. शिष्याने एक नायलॉन दोरी आणली होती. महंत यांनी या दोरीनेच गळफास घेतला.
Mahant Narendra Giri Death, महंत नरेंद्र गिरीमृत्यू प्रकरणातील सुसाईड नोट हाती, काय लिहिलंय? – Mahant Narendra Giri death case suicide note recovered by police :
अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी प्रकरणातील सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येला शिष्य आनंद गिरी, आघा तिवारी आणि एकाला जबाबदार धरले आहे. तसेच, मागील आठवड्यातसुद्धा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मरणानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याची देखील नोंद सुसाईड नोटमध्ये केली आहे. (Mahant Narendra Giri suicide note)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Mahant Narendra Giri death case suicide note recovered by police.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं