काँग्रेस-एनसीपी'ची आगामी निवडणुकी'बाबत महत्वाची बैठक

मुंबई : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावरुन काँग्रेस-एनसीपी’ची महत्वाची बैठक राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर पार पडली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्व जागांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त असून आघाडी निश्चित असल्याचे समजते.
काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, संजय निरुपम तर एनसीपी’कडून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या फेऱ्यांवरून आघाडी निश्चित असल्याचे समजते. तसेच बहुजन विकास आघाडी, सपा आणि बसपाला सुद्धा सोबत घेण्याचा निर्णय होऊ शकतो असं वृत्त आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी निश्चित असल्याने आता भाजप आणि शिवसेनेवरील दबाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास शिवसेना आणि भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं