व्हिडिओ; नमो भक्ताला मनसेच्या महिलांनी ऑफलाईन घेरताच उडाली घाबरगुंडी, सगळं कबूल केलं

बदलापूर : विवेक भागवत या नमो भक्ताने काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर अत्यंत गलिच्छ भाषेत एकामागोमाग एक पोस्ट टाकल्या होत्या. परंतु, मनसे कार्यकर्त्यांकडून त्याला फेसबुकवर धारेवर धरण्यात आलं तेव्हा त्याने माझं अकाउंट हॅक झाल्याचा कांगावा सुरु केला होता. तरीही त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेक विरोधकांच्या बाबतीत संतापजनक आणि फेक पोस्ट दिसत होत्या. पोस्ट मध्ये महिलावाचक अपशब्द वापरल्याने संतापलेल्या मनसे महिला आघाडीने त्याचा ऑफलाईन शोध सुरु केला होता.
त्या भक्ताला मनसेच्या महिलांनी बदलापूरमध्ये गाठला. मनसे महिला आघाडीच्या कार्यकर्त्याचा संताप पाहून त्या विवेक भागवत नामक भक्ताची भंबेरीच उडाली. त्याने थेट सगळं मान्य करत माफीनामा दिला कि, ‘मी खोटी पोस्ट टाकली, माझ्या कडुन चुक झाली व माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले हे पण खोटे आहे. राज साहेबांची व बदलापुर मनसे सैनिकांची जाहीर माफी मागतो’ असा पूर्ण कबुली नामा सुद्धा दिला.
विशेष म्हणजे सरळ खळखट्याक करणाऱ्या या मनसे महिला कार्यकर्त्यांनी त्या भक्ताला केवळ तो मराठी असल्याने हात न लावता तंबी देत सर्व कबुली घेतली. इतकंच नाही तर उद्या संकटात आलास तर राज ठाकरेच पुढे येतील आणि कोणीही मोदी किंवा मोदीभक्त येणार नाहीत अशी भावनिक जाणीव सुद्धा मराठी म्हणून करून दिली.
परंतु, मनसे महिला आघाडीच्या या अवताराने सर्व ऑनलाईन डिजिटल भक्तांना ऑफलाईन इशारा दिला गेला आहे. एकूणच फाजील भक्तांविरुद्ध मनसेने सुरु केलेलं हे ऑफलाईन आंदोलन, इतर पक्ष सुद्धा आत्मसात करतील आणि फेक अकाऊंचा वापर करून समाज माध्यमांवर हौदोस घालणाऱ्या भक्तांना धडा शिकवतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
काय आहे नेमका व्हिडिओ?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं