मुंबईत पेट्रोलची नव्वदी पार, महागाईचा भडका अजून वाढणार

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सुद्धा वाढ झाली आहे. पेट्रोल ११ पैशांनी तर डिझेल ५ पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलनं नव्वदी पूर्ण केली आहे. आता मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी तब्बल ९०.०८ रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ९०.०८ रुपये तर डिझेलचे दर प्रतिलिटर ७८.५८ रुपये एवढे झाले आहेत. दुसरीकडे नवी दिल्लीत पेट्रोल ८२.७२ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर ७४.०२ रुपये प्रतिलिटर एवढे भाव झाले आहेत.सततच्या या इंधन दर वाढीने सामान्य माणूस पुरता कोलमडला आहे आणि त्यात वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम महागाई सुद्धा वाढत असून रोजचा भाजीपाला सुद्धा महागला आहे. त्यामुळे मोदी सरकार विरोधात रोष वाढताना दिसत आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.82.72 per litre & Rs.74.02 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.90.08 per litre & Rs.78.58 per litre, respectively. pic.twitter.com/LOwXRbJAOL
— ANI (@ANI) September 24, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं