महत्वाच्या बातम्या
-
Sneha Aniket Vishwasrao | अभिनेता अनिकेत विश्वासराविरोधात पत्नीचा छळ-मारहाणीचे आरोप | पोलिसात गुन्हा दाखल
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात त्याची पत्नी स्नेहा विश्वासराव (Sneha Aniket Vishwasrao) हिने कौटुंबिक हिंसाचार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याचवेळी स्नेहाने आपल्या सासू-सासऱ्यांविरोधात देखील तक्रार केली आहे. याचप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आल्याने मराठी सिनेसृष्टीत मात्र एकच खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Alleging Fraud | शिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरुद्ध मुंबई पोलिसात FIR दाखल
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. पॉर्न केसमध्ये अडकल्यानंतर आता राज कुंद्रा पुन्हा एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकताना दिसत आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा (Alleging Fraud) दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Squad Review | रिनजिंग डेन्झोंगपाचा डेब्यू चित्रपट 'स्क्वॉड' थरार
नुकताच ‘स्क्वॉड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातून अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांचा मुलगा रिंजिंग हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याला अॅक्शन हिरो म्हणून स्क्वॉडमधून लॉन्च करण्यात आले आहे. अनिता राज यांची भाची मालविका राज देखील या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. मालविकाने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात पूजा (करीना कपूर) ची बालपणीची भूमिका (Squad Review) साकारली होती.
4 वर्षांपूर्वी -
Sooryavanshi on Netflix | 'सूर्यवंशी' चित्रपटाचा OTT'वर धुमाकूळ | नेटफ्लिक्स, मेकर्समध्ये करोडोची डील
अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला लोक खूप प्रेम देत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर टाळ्या लुटणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला 8 दिवस पूर्ण झाले असून या 8 दिवसात चित्रपटाने 120 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 100 कोटी क्लबमध्ये चित्रपटाचा समावेश झाल्यानंतर निर्मात्यांनी आता चित्रपट ओटीटीकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी नेटफ्लिक्सशी हातमिळवणी (Sooryavanshi on Netflix) केल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
Vicky Kaushal Katrina Kaif Wedding | विकी आणि कतरिनाच्या लग्नात या पाहुण्यांना विशेष निमंत्रण
विकी कौशल आणि कतरिना कैफ आजकाल त्यांच्या चित्रपटांपेक्षा लग्नासाठी जास्त चर्चेत आहेत. हे दोन्ही सिनेस्टार पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. कतरिना-विकी दोघेही राजस्थानमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत शाही विवाहसोहळा पार पाडणार आहेत. आतापर्यंत दोघांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding) आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी