Best Selling Scooter | 'या' स्कूटरच्या विक्रीत विक्रमी वाढ; ग्राहकांच्या शो-रूम'मध्ये रांगा, या 3 स्कूटर आहेत टॉप - Marathi News

Best Selling Scooter | प्रत्येक महिन्याला लाखो व्यक्ती मार्केटमध्ये आलेल्या नवनवीन स्कूटर खरेदी करत असतात. आजकाल प्रत्येकाला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारी वाहन पसंतीस उतरतात. दरम्यान या बातमीपत्रातून ऑक्टोबरच्या अहवालानुसार कोणत्या टॉप 10 स्कूटरच्या विक्रीमध्ये 27 अधिक वाढ झाली आहे हे आम्ही सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया. होंडा एक्टिवा ही पहिल्या क्रमांकावर असून 2.66 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी खरेदी केली आहे. एवढेच नाही तर बजाज आणि ओलासह इतर स्कूटरस देखील टॉप 10 लिस्टमध्ये शामील आहेत.
होंडा एक्टिवा :
होंडा कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर ही एक्टिवा आहे. बाजारात या स्कूटरची प्रचंड प्रमाणात मागणी आहे. सध्या या स्कूटरची किंमत 77,000 रुपयांपासून सुरू होते. आतापर्यंत एकूण 2,66,806 व्यक्तींनी स्कूटर खरेदी केली आहे.
सुजुकी एक्सेस :
2024 च्या ऑक्टोंबर महिन्यात ग्राहकांनी सुझुकी एक्सेस खरेदी करण्यास चांगली हजेरी लावली होती. तब्बल 74,813 लोकांनी सुझुकी एक्सेस खरेदी केली आहे. ग्राहकांच्या किमतीत गेल्यावर्षीच्या अहवालानुसार 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
TVS ज्युपिटर :
TVS जुपिटर ही सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरमधील टॉप 3 मध्ये येणारी स्कूटर आहे. गेल्याच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 1,09,702 लोकांनी ही स्कूटर खरेदी केली आहे. ग्राहकांची ही वार्षिक वाढ 19.47% आहे.
ओला S1 :
देशामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक स्कूटरपैकी ओला S1 ही एकमेव स्कूटर आहे. या स्कूटरची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. आतापर्यंत एकूण 41,651 ग्राहकांनी स्कूटर खरेदी केली आहे.
TVS NTorq :
टीवीएस मोटार कंपनीच्या या मॉडलला देखील बाजारात प्रचंड मागणी आहे. ऑक्टोंबर महिन्यात गेल्यावर्षीच्या अहवालानुसार 40000 व्यक्तींनी हे मॉडेल खरेदी केलं आहे.
बजाज चेतक :
बजाज ऑटो कंपनीची इलेक्ट्रॉनिक स्कूटर बजाज चेतक हिने देखील 30,644 युनिट्सची मोठी विक्री केली आहे.
होंडा Dio :
होंडा डियोने 33,179 युनिट्सची विक्री केली. होंडा डियो ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर पैकी एक आहे.
TVS iQube :
TVS मोटार कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर TVS iQube हिला देखील बाजारात प्रचंड मागणी आहे. ही स्कूटर आतापर्यंत 28,923 व्यक्तींनी खरेदी केली आहे.
Latest Marathi News | Best Selling Scooter 30 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं