GT Force e-Scooter | जीटी फोर्सची सोल वेगास आणि ड्राइव्ह प्रो ई-स्कूटर लाँच, किंमत आणि फीचर्स तपशील पहा

GT Force e-Scooter | जर तुम्ही या फेस्टिव्ह सीजनमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी जीटी फोर्सने जीटी सोल वेगास आणि जीटी ड्राइव्ह प्रो या दोन नव्या लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. कंपनीने जीटी सोल वेगास इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 47,370 रुपये आणि जीटी ड्राइव प्रो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 67,208 रुपये ठेवली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये लेड-अॅसिड बॅटरी किंवा लिथियम-आयन पॅक उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये काय खास आहे.
कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन :
दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केल्या आहेत. म्हणजेच शहरात कमी अंतरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. जीटी सोल वेगासमध्ये ६० किमी रेंजसह ६० व्ही २८एच लीड-अॅसिड बॅटरी मिळते, तर ६० व्ही २६ एएच लिथियम-आयन बॅटरी ६५ किमी रेंज देते. कंपनीच्या दाव्यानुसार, लेड-अॅसिड बॅटरीसाठी सुमारे 8 तास आणि लिथियम-आयन बॅटरी पॅक पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात.
अनेक वैशिष्ट्ये – जीटी सोल वेगास : GT Soul Vegas
या स्कूटरचे वजन 95 किलो (लीड-अॅसिड) आणि 88 किलो (लिथियम-आयन) असून, तिची लोड वाहून नेण्याची क्षमता 150 किलो आहे, ज्यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी आहे. स्कूटरमध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल सिस्टम आणि इग्निशन लॉक स्टार्ट सारखे फीचर्स आहेत. याशिवाय यात टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि ड्युअल ट्यूब रियर सस्पेंशन मिळते. कंपनीने याला ग्लॉसी रेड, ग्रे आणि ऑरेंजसह तीन एक्सटीरियर कलर ऑप्शनमध्ये सादर केले आहे.
अनेक वैशिष्ट्ये – जीटी ड्राइव प्रो : GT Drive Pro
या ई स्कूटरमध्ये 48 वी 28Ah लीड-अॅसिड बॅटरी किंवा जीटी सोल वेगास सारखीच रेंज देणारा 48V 26Ah लिथियम-आयन पॅक मिळतो. रिचार्जची वेळही तशीच आहे. जीटी ड्राइव्ह प्रोमध्ये जीटी सोल वेगाससारखीच वैशिष्ट्ये आहेत, तर त्याचे वजन 85 किलो आहे आणि ते 140 किलो वजन वाहून नेऊ शकते. जीटी ड्राइव्ह प्रो व्हाईट, ब्लू, रेड आणि चॉकलेटसह चार बाह्य रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने मोटरवर १८ महिन्यांची वॉरंटी, लेड-अॅसिड बॅटरीसाठी एक वर्षाची वॉरंटी आणि स्कूटरच्या दोन्ही मॉडेल्ससाठी लिथियम-आयन पॅकवर तीन वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: GT Force e-Scooters GT Soul Vegas and GT Drive Pro check price details 29 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं