Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hero Passion XTec | टू-व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्पने आज (24 जून) आपली नवी पॅशन ‘एक्सटेक’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याची किंमत ७४,५९० रुपयांपासून (एक्स शोरूम, दिल्ली) सुरू होते. या बाइकमध्ये ११० सीसी इंजिन असून ९ बीएचपी (ब्रेक हॉर्सपॉवर) पॉवर आउटपुट आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिविटी, एसएमएस आणि कॉल अलर्ट, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, लो फ्युएल इंडिकेटर, साइड-स्टँड इंजिन कट ऑफ आणि सर्व्हिस रिमाइंडर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
पॅशन एक्सटेक किंमत :
हिरोचा नवा पॅशन एक्सटेक दोन पर्यायात उपलब्ध आहे. याच्या ड्रम ब्रेक व्हेरियंटची किंमत ७४५९० रुपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर डिस्क ब्रेक व्हेरिएंट या दुसऱ्या पर्यायाची किंमत 78990 रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही किंमती दिल्लीच्या एक्स-शोरूम किंमती आहेत.
ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद :
‘एक्सटेक’ उत्पादनांमध्ये कंपनीने देऊ केलेल्या सर्व बाइक्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून पॅशन एक्सटेकलाही तेवढाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा हिरो मोटोकॉर्पचे स्ट्रॅटेजी अँड ग्लोबल प्रॉडक्ट प्लॅनिंगचे प्रमुख मालो ले मेसन यांनी व्यक्त केली. ‘एक्सटेक’ उत्पादनांच्या रेंजमध्ये कंपनीने स्प्लेंडर+ एक्सटेक, ग्लॅमर १२५ एक्सटेक, प्लेजर+ ११० एक्सटेक आणि डेस्टिनी १२५ एक्सटेक सादर केले असून या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Hero Passion XTec bike launched check price in India 25 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं