Aryan Khan Bail | कोर्टाने 20 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवल्याने आर्यनचा कोठडीतच मुक्काम

मुंबई, १४ ऑक्टोबर | मुंबईतील हायप्रोफाईल क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात कोर्ट कोठडीत अडकलेल्या आर्यन खान सह इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पार पडली. परंतु, कोर्टाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल (Aryan Khan Bail) राखून ठेवल्याने खान कुटुंबियांना पुन्हा धक्का बसला आहे. जवळपास आठवड्याभरावर म्हणजे 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देणार असल्याने आर्यन खानचा मुक्काम अजून वाढला आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
Aryan Khan Bail. The hearing on the bail application of Aryan Khan and others in judicial custody in the Cruise Rev. Drugs Party case has been completed. However, the court has reserved its verdict on Aryan Khan’s bail application. The court will give its verdict on October 20 :
मुंबईतील हायप्रोफाईल क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सह त्याचा जवळचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी झाली. मानेशिंदे यांना हटवल्यानंतर आर्यनच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी जोरदारपणे न्यायालयात आर्यनची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी लावून धरली. तर एनसीबीच्या वकिलांनी त्याला विरोध केला. दुपारी एक वाजपल्यापासून एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु होता. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर कोर्टाने आपाला निकाल राखून ठेवला आहे.
कोर्टाने संपूर्ण सुनावणीत दोन्ही पक्षाच्या बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्या. मात्र त्यानंतर आपला निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला. परिणामी पुढचे ५ दिवस कोर्टाला सुट्ट्या आहेत. यामध्ये ईद, दसरा तसेच शनिवार आणि रविवार अशा सुट्ट्या आहेत. त्यामुळे आर्यन खानला आपला आगामी ६ दिवस कोठडीतच काढावे लागणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Aryan Khan Bail the court has reserved its verdict on Aryan Khan’s bail application.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं