महत्वाच्या बातम्या
-
Pornography Case | पत्नी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या विरोधात साक्षीदार | चार्जशीट दाखल
पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी साक्षीदार आहे. तसेच पोर्नोग्राफीबाबत वापरल्या जाणाऱ्या हॉटशॉट्स अॅपचा सूत्रधार राज कुंद्रा हाच असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर आज (16 सप्टेंबर) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेता सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर? | कार्यालयाची पाहणी
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाने सर्वेक्षण केले. सूदशी संबंधित खात्यांच्या पुस्तकांसोबत छेडछाड केल्याचा दावा आहे तेव्हापासून आयकर विभाग सोनूच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. आयकर विभागाने सोनू आणि त्याच्या कंपनीशी संबंध असलेल्या 6 जागांचे सर्वेक्षण केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Javed Akhtar Talked on Hindu | जगात सगळ्यांत सभ्य आणि सहिष्णू फक्त हिंदूच | हिंदुस्थान कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही
प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्यावर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली असल्याचा आरोप करत देशभरातून जोरदार टीका करण्यात आली. मात्र जगात सगळय़ांत ‘सभ्य’ आणि सहिष्णू फक्त हिंदूच! हिंदुस्थान कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये असल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही धर्मात, जगातील कोपऱ्यात तालिबानी प्रवृत्तीचे लोक असू नयेत, असे परखड मतही मांडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मानहानी प्रकरण | कंगनाला धक्का | जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकिल रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात कंगनाची तर वकिल जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
4 वर्षांपूर्वी -
भाईजान'ला अडवणाऱ्या ASI वर CISF'कडून प्रोटोकॉल उल्लंघनाचा आरोप | मोबाईलही जप्त
अभिनेता सलमान खान नुकताच त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून रशियाला रवाना झाला. या दरम्यान मुंबई विमानतळावरून सलमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यात सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाने चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेले दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकाने या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक केले. या CISF जवानाचे नाव सोमनाथ मोहंती आहे.
4 वर्षांपूर्वी -
दरमहा 5 लाख कमवण्याचे अमीष देऊन 1.36 कोटी हडपले | शिल्पा शेट्टी व तिच्या आई विरुद्ध FIR दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा यांच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या एका महिला उद्योजकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्योत्सना चौहान असे त्या महिलेचे नाव असून तिने दिव्य मराठीशी बोलताना आपबिती मांडली आहे. शिल्पा शेट्टी आणि आईन सुनंदा यांच्या कंपनीने आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. ज्योत्सना सांगते, तिने शिल्पाच्या कंपनीत 1.36 कोटींची गुंतवणूक करून लखनऊ येथे वेलनेस सेंटर सुरू केले होते.
4 वर्षांपूर्वी -
पॉर्नोग्राफी प्रकरण | शर्लिन चोप्राच्या ८ तास चौकशीनंतर राज कुंद्रा अधिकच अडचणीत
पोर्नोग्राफी प्रकरणी क्राइम ब्रांचच्या विशेष पथगकाने मॉडेल शर्लीन चोप्राची 8 तास चौकशी केली. शर्लीन चौकशीसाठी क्राइम ब्रांचमध्ये शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पोहोचली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडली. या दरम्यान तिने राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तिने राजच्या विरोधात काही गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज कुंद्राची अटक योग्यच | मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राज कुंद्रासह त्याच्या कंपनीतील आय.टी. प्रमुख रायन थॉर्पचीही अटक योग्यच आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? | हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापले
पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.
4 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या सर्व सुनावणीला गैरहजर | आता न्यायालयाच्या 'या' निर्णयाने कंगना अडचणीत येणार
अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. परंतु एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही.
4 वर्षांपूर्वी -
पोर्न प्रकरणात राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | पोलिस अजून पुरावे गोळा करणार
पोर्न फिल्म बनवणे आणि ऑनलाइन वितरित केल्याप्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी समाप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुंद्राला कोर्टात हजर केले. यावेळी पोलिसांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, आता चौकशी पुरे नवीन पुरावे गोळा करा असे म्हणत कोर्टाने कुंद्राला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.
4 वर्षांपूर्वी -
अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण | शिल्पाने हॉटशॉट ॲपचे खापर मेहुणा प्रदीप बक्षी यांच्यावर फोडले
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी सोमवारी (१९ जुलै) अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली. अटकेपासून राज कुंद्रा हे चर्चेत आहेत. पोलिसांनी अटकेपूर्वीच कुंद्रांची चौकशी केली होती. तर त्यानंतर शिल्पा शेट्टीचीही चौकशी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी राज कुंद्रांसह शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्या घरावर छापाही टाकला. पोलिसांनी घराची त्याबरोबर कार्यालयाची झाडाझडती घेतली.
4 वर्षांपूर्वी -
हायप्रोफाईल राज कुंद्रा प्रकरण | मुंबई पोलिसांचे हात खोलवर जाताच ED सुद्धा प्रकरणात उडी घेणार?
पॉर्न मूव्हीज प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा शिल्पा शेट्टीला समन्स बजावणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता, पण शिल्पाने राज कुंद्राच्या वियान इंडस्ट्रीजमधून काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिल्पा बहुतेक व्यवसायात कुंद्राची भागीदार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन शिल्पा शेट्टीच्या घरी | पुराव्यांचा शोध घरापर्यंत
पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन दाखल झाली आहे. पोलिसांची टीम चौकशी व राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी शिल्पाच्या घरी दाखल झाली आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अश्लील फिल्म प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर सध्याचा काळ आव्हानांचा सामना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. शिल्पा म्हणाली की, जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असून या प्रकरणाचाही ती धैर्याने सामना करेल.
4 वर्षांपूर्वी -
पोर्नोग्राफिक प्रकरणात सहभागाचा संशय | शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा हा अडचणीत सापडला आहे. गुन्हेशाखेने पोर्नोग्राफिक फिल्मस आणि हे फिल्म काही अॅपमधून प्रदर्शित केल्याबद्दल त्याला अटक केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफिक फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | करीना कपूरच्या विवादित 'प्रेग्नेंसी बायबल’ संदर्भात कायदेतज्ज्ञ काय सांगतात?
बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करीनाने तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच नावं ‘प्रेग्नेंसी बायबल’ असे आहे. करीना या पुस्तकाच्या नावामुळे आणि त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. मी एक चांगली आई आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करायची गरजं नाही हे करीनाने पुस्तकात सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर मनसेची पोस्टरबाजी... काय कारण?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे नसून राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाकडून लावण्यात आले आहेत. झाले असे की, बृहन्मुंबई महानगरपालिका जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची एक भिंत पाडण्याची तयारी करत आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि बीएमसीला हा रस्ता रुंद करायचा आहे, यामुळे अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना ‘पंतप्रधानपदी’ पाहणं म्हणजे मोदींना ‘पंतप्रधान’ म्हणून कायम करणं - जावेद अख्तर
देशात सध्या कोरोना आपत्तीमुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची ३ प्रमुख राज्यांत बिकट अवस्था झाली आहे. त्यात देशातील संपूर्ण भाजपाला एकट्या ममता बॅनर्जींनी दिलेली मात ही विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्यात कारणीभूत ठरली आहे. तसेच उत्तर प्रदेशात देखील पंचायत निवणुकीत भाजपाची चिंता वाढली आहे. मात्र यामध्ये काँग्रेसने कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही.
4 वर्षांपूर्वी