महत्वाच्या बातम्या
-
पायल घोषचा RPI'मध्ये प्रवेश | २०१४ मध्ये राखी सावंतने केला होता प्रवेश
दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक छळवणुकीची तक्रार केल्यामुळं चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | करण जोहरच्या घरी पार्टीत ड्रग्सचा वापर नाही | ती पांढरी रेष ड्रग्स नव्हे मग काय होतं?...वाचा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिज्मसोबत ड्रग्सवरूनही अनेक गंभीर आरोप झाले होते. अशातच २०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. पण आता एका फॉरेन्सिक रिपोर्टने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही | पुन्हा मुख्यमंत्री लक्ष
मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून भाषण करतोय, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप, मोदी सरकार, कंगना राणौत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी कंगनावर केली. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला आता कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
SSR Case | या वृत्तवाहिन्यांना २७ ते ३० ॲाक्टोबर दरम्यान जाहीर माफी मागण्याचे आदेश
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज तक वृत्तवाहिनीला एक लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ व आज तक (Aak Tak, ZEE News, India TV, News24) या वाहिन्यांना सार्वजनिक माफी मागायचे आदेश न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
चौकशीसाठी नोटीस मिळाल्यावर कंगना पुन्हा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल बरळली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
डिजिटली वातावरण बिघडवलं | पोलिसांकडून कंगनाला व्हाट्सअँपवर डिजिटल नोटीस
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला वांद्रे पोलीस चौकशी बोलावणार आहेत. येत्या सोमवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. कंगनाला मुंबईपोलिसांनी व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे. कंगनासह तिची बहीण रंगोलीलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघींना सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियामार्फत दोन गटांमध्ये धार्मिक वैर वाढवणे | PoK वक्तव्य | FIR दाखल होणार
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय | अन्यथा मुंबई पोलीस - गृहमंत्री
बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन यावरुन राजकारण देखील तापले आहे. यावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे. एनसीबीने तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॉलीवूड संपवण्याचा डाव आहे | मुख्यमंत्री ठाकरेंकडून थेट इशारा
‘बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सँडलवूड ड्रग्ज प्रकरण | विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आहे. तो सध्या गायब असल्याने आता त्याच्या तपासासाठी बंगलुरू पोलीस मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | बॉलीवूड प्रोडक्शन हाऊसेसकडून कंगनाविरोधात कोर्टात खटला दाखल
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कमालीच्या आक्रमक झालेल्या आणि बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि ड्र्रग्स रॅकेटवर टीका करणाऱ्या कंगना राणौत हिने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्री ही ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार झाले आहे, अशी टीका कंगनाने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फक्त TRP'साठी आरडाओरडा करू नका | लोकं TV बंद करून पुढे जातील - सलमान खान
मुंबई पोलिसांनी नुकतंच टीआरपी घोटाळा (TRP scam) प्रकरणी तीन संशयित वाहिन्यांचा खुलासा केला होता. यानंतर आता सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस १४च्या (Bigg Boss 14) वीकेंड का वार या भागात त्याच्यावर टीका करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर निशाणा साधला आहे. सलमानने कुणाचेही नाव घेतलेले नाही, पण ज्यापद्धतीने त्याने टीआरपीचा उल्लेख केला त्यावरून त्याचा रोख कुणाकडे होता हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेजबाबदार बातम्या | रिपब्लिकसहित टॉप मीडिया हाऊसेस विरोधात बॉलीवूड कोर्टात
बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकरीविरोधी ट्विट भोवलं | कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे कर्नाटकातील कोर्टाचे आदेश
कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्वीटसाठी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (FIR) दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं शुक्रवारी पोलिसांना हे आदेश दिले. वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत संबंधित बनावट वृत्त | आज तक'ला दंड तर ३ वाहिन्यांना माफी मागण्याचे आदेश
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संंबंधित बनावट ट्विट प्रसारित केल्याबद्दल ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी (एनबीएसए) या संस्थेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फिल्मी राणी लक्ष्मीबाईची पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या विधानावरून पलटी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असं सांगणारा रिपोर्ट एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग नंबर एकला ट्रेण्ड होताना दिसत आहे. ”सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन”, असं वक्तव्य कंगना रणौत जुलै महिन्यामध्ये केलं होतं. मात्र, एम्स रुग्णालयाकडून आलेल्या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह अनेकांनी तिच्याकडे पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. परंतु, या सगळ्यावर कंगनाने मौन सोडलं असून तिचं मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतने आत्महत्याच केली हे कशावरून? | AIIMS च्या डॉक्टरांनी दिलं स्पष्टीकरण
AIIMS च्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ला दिला. सीबीआयनेदेखील हा अहवाल मान्य केला आहे. मात्र एम्सच्या या रिपोर्टवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुशांतचा मृत्यू गळफासामुळे झाला हे रिपोर्टमधून सांगू शकता पण ही आत्महत्याच आहे हे कशावरून सांगता अशी विचारणा वकिलांनी केली. हे तर सीबीआयला आपला तपास आणि पुराव्यानुसार सिद्ध करावं लागेल, असं सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
रिया सुटली, भाजपाची पाटी फुटली | काँग्रेसचा भाजपाला टोला
सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
5 वर्षांपूर्वी -
अतिउत्साही माध्यमांना मुंबई पोलिसांच्या सूचना | रियाचा पाठलाग करु नये
सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर
मुंबई, ७ ऑक्टोबर : सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
5 वर्षांपूर्वी