महत्वाच्या बातम्या
-
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण | सारा आणि श्रद्धा कपूरला समन्स | व्हॉट्सएप चॅट नडलं
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये नवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना समन्स पाठवण्यात येणार आहे. एनसीबीच्या तपासात व्हॉट्सएप चॅट समोर आले आहेत. चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात यामध्ये चर्चा सुरु आहे. एनसीबीच्या सुत्रांनुसार श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि सुशांतची टॅलेंट मॅनेजर राहीलेल्या जया शाह यांच्यातील ही चॅट आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या Y Plus सुरक्षेत कंगना आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली
आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने आता नवा वाद ओढवून घेतला आहे. कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरू लागला असताना व हे आंदोलन चिघळत चालले असतानाच कंगनाने या आंदोलकांना दहशतवादी म्हटल्याने ती चांगलीच गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सरकार लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करतंय | अनुरागचा प्रहार
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील त्यावर आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं | अनुराग कश्यपकडून पाठराखण
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील त्यावर आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंच्या दाव्याला प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा | पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला आहे. दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच | BMCचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
अभिनेत्री कंगना रानौत हिने आपले ऑफिस बांधकाम करताना अनधिकृतपणे बदल केला. त्यामुळे मुंबई पालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. कंगनाच्या ऑफिसवरची कारवाई योग्यच होती, असे प्रतित्रापत्र मुंबई उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेने दाखल केले आहे. कंगनाच्या मालमत्तेत १४ निहमबाह्य बदल करण्यात आले होते. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असल्याची ठाम भूमिका मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याचा कंगनाचा दावा धादांत खोटा | हे आहे सत्य
मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. कंगनानं केलेल्या नव्या विधानांची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ‘मी शिवसेनेला मतदान केले आणि ते माझ्यासोबत असे वागत आहेत,’ असं तिने म्हटलं आहे. मात्र कंगनाचं नाव ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथून भाजपाचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान कसं केलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या मागील सत्य वेगळं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर आरोप केले, अनेकांवर टीका केली, अनेक वादग्रस्त वक्तव्यही तिनं केली. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नव्हे तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनाही तिनं लक्ष्य केलं. मुंबई महापालिकेनं तिचं ऑफिस पाडल्यानंतर तर ती अधिकच संतप्त झाली आणि तिने एकामागो एक अशा ट्वीटची मालिका सुरूच ठेवली.
5 वर्षांपूर्वी -
असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत | जे आता पुन्हा सन्मान मिळवू शकणार नाहीत - सोनू सूद
कंगना रानौत सध्या लहान मोठ्यांपासून सर्वांनाच लक्ष करून अत्यंत संतापजनक ट्विट करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.
5 वर्षांपूर्वी -
कंगना बरळली | उर्मिला स्पॉट पॉर्न स्टार | उर्मिलाचं संयमी प्रतिउत्तर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर आता निशाणा साधला आहे. उर्मिलाला स्पॉट पॉर्न स्टार म्हणत कंगना हिने तिच्या अभिनय कौशल्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कंगना रनौत हिने तिच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. एक सुंदर विचार शेअर करत तिने ‘शिवाजी महाराज अमर रहें’ असे म्हटले आहे. तसंच ‘जय महाराष्ट्र, जय हिंद’चा ही नारा तिने दिला.
5 वर्षांपूर्वी -
दिशाच्या लिव्ह इन पार्टनरचा जबाब महत्त्वाचा | नितेश राणेंच अमित शहांना पत्र
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करून तीन महिने उलटले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. पुढील आठवड्यात सुशांतची व्हिसेरा रिपोर्ट समोर येणार आहे. या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वेबसाईटवरच लिहिलंय बनावट बातम्या | कंगनाकडून शिवसेनेला लक्ष करताना वापर
अनेकदा हे सिद्ध झालं आहे की इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्वच गोष्टी सत्य नसतात किंवा त्या अर्धसत्य असतात. त्यामुळे अनेकदा खोटी वृत्त प्रसिद्ध होतात किंवा एखाद्याच्या बदनामीसाठी इंटरनेटवरील खोट्या वृत्तांचा आसरा घेतला जातो. समाज माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या प्रसिद्ध होतं असल्याने फॅक्ट-चेक सारखे विषय समोर आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांनी इंडस्ट्रीत नावं कमावली | त्यांना गटार म्हटलं जातंय | जया बच्चन संतापल्या
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाटच सोशल मीडियावर उसळली. मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला. याबाबत राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या की, बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू सापडल्या | सविस्तर वृत्त
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. आता एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासणीत एनसीबीला सुशांतच्या फार्म हाऊसमधून बर्याच नवीन गोष्टी सापडल्या आहेत. फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज, काही औषधं सापडली आहेत. ज्यावरून दिसून येते की फार्महाऊसवर ड्रग पार्ट्या झाल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाची बाजू घेतली | त्या सर्वांची तोंडं काळी करून ती आज गेली - आ. प्रताप सरनाईक
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग चौकशीत अडकण्याआधीच कंगनाने मुंबईतून पळ काढला? जातानाही PoK म्हणून पळाली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आज सकाळी मुंबईतून मनालीसाठी रवाना झाली. मात्र जाता जाता कंगनानं महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा निशाणा साधला आहे. कंगनानं एका शेरोशायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधत एका महिलेवर अन्याय करुन पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे असा दावा तिने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
वैयक्तिक मालमत्तेवर कारवाई केल्याने राज्यपालांची भेट | देशाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण
अभिनेत्री कंगना रानौतने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांची चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला महापालिकेकडून दुसरा झटका मिळणार | खारमधील फ्लॅटप्रकरणी पाठवली नोटीस
मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबईचा अपमान करणाऱ्या नटीच्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवी आहे असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. रविवारच्या रोखठोक या सदरात एक खास लेख लिहून त्यांनी कंगना रणौत, भाजपा आणि मागच्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. दुसरीकडे कंगनाची कार्यलयानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाची खार वेस्ट स्थित फ्लॅटवरून तिला नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगना म्हणालेली मी बीफ खाल्लं, मला ते खूप आवडलेलं | संकट येताच राणी लक्ष्मीबाईचा कांगावा
२०१९ मध्ये चित्रपट निर्माता करण जोहरसोबत कंगनाचा वाद विकोपाला गेला होता. आणि आदित्य पंचोली सोबतही वाद तीव्र झाला होता. त्यावेळी समाज माध्यमांवर नेटिझन्सनी कंगनाला मोठ्या प्रमाणावर कंगनाला लक्ष करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी एका नेटिझन्सने तिला झोडपताना तिच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली होत. त्यावर प्रतिउत्तर देताना मी केवळ मांसाहारीच नाही तर गोमांस खाणारी देखील आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही असं तिनं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर बॉलीवूड संबधित पोर्टल्सवर याची जोरदार चर्चा देखील रंगली होती.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग्ज कनेक्शन चौकशीत अडकण्यापूर्वीच कंगना रानौत कुटुंबासहीत भाजपमध्ये दाखल होणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कंगनाने शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी