Baking Course | बेकरी व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विज्ञान विद्यापीठात प्रशिक्षणाची संधी, वाचा सविस्तर - Marathi News

Baking Course | आज महाराष्ट्रात बऱ्याच तरुणांनी लहान वयात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सध्याच्या तरुण पिढीला नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे फायद्याचे वाटते. कोरोना काळात बेकरी व्यवसायाला चांगलेच प्राधान्य मिळाले होते. अनेकांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन बेकरी कोर्स पूर्ण केलेत. आता तुम्हाला बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. नेमकी काय आहे यामागची प्रोसेस पाहूया.
महाराष्ट्रातील तरुणांना बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर, हा लेख तुमच्यासाठी आहे. बेंगळुरू येथील विद्यापीठात तुम्हाला कमी दरात प्रशिक्षण घेता येणार आहे. हा कोर्स केवळ 25 दिवसांचा असून विद्यापीठाकडून अर्जासाठी आवाहन करण्यात आले आहे.
कुठे देणार प्रशिक्षण :
बेंगळुरू शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर सायन्स बेंगळुरू, मूल्य संवर्धन विस्तार निदेशालय, जीकेवीके येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे शुल्क 3,455 रुपये असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रशिक्षण किट आणि अभ्यासक्रम दिला जाणार आहे. ज्यामध्ये बेकरीचे पदार्थ शिकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यपासून ते यंत्रणांपर्यंत सर्व माहिती दिली जाणार आहे.
कोणते पदार्थ शिकवले जातील :
कोकोनट कुकीज, बनाना केक, पीनट कुकीज, मसाला बिस्कीट, नटरिंग, सनशाइन केक, डॅनिश पेस्ट्री, बॉम्बे खरा, ब्लॅक फॉरेस्ट केक यांसारखे बरेच बेकरीचे पदार्थ शिकवण्यात येणार आहे.
सध्या मार्केटमध्ये बेकरीचे पदार्थ खाण्याचे वेड लोकांना लागलं आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना बेकरीचे डिलेशियस पदार्थ आवडतात. साधा केक असो किंवा क्रीमचा केक, साधा बन असो किंवा ट्रूटी फ्रूटी बन, त्याचबरोबर क्रीम रोल, फ्लफी केक, कप केक यासारखे बरेच बेकरीचे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात आणि विकलेही जातात. त्यामुळे तुम्हाला बेकरीचा सुंदर असा व्यवसाय करायचा असेल तर, तुम्ही बंगळूर येथे जाऊन शिक्षण घेऊ शकता.
प्रशिक्षणाचे ठिकाण, तारीख आणि वेळ :
प्रशिक्षणाचे ठिकाण : कृषी विज्ञान विद्यापीठ, बंगळुरू टेक्नॉलॉजी विद्यापीठ, आणि मूल्य संवर्धन विस्तार निदेशालय, जीकेवीके बेंगळुरू.
* प्रशिक्षणाची वेळ : सकाळी 9:30 ते दुपारी 12:30
* प्रशिक्षणाची तारीख : 04 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर
* प्रशिक्षण किट आणि अभ्यास शुल्क किती असेल : 3,455
प्रशिक्षण घेताना तुमच्या डोक्यावर टोपी आणि बॉडीला एप्रन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तोंडाला मास्क असणे अनिवार्य आहे. तू मला आणखीन माहिती हवी असेल तर, 9740618692, 9731164357 या क्रमांकावर संपर्क साधा. त्याचबरोबर तुम्हाला अधिकृत माहिती हवी असेल तर, www.bakerytrainingunituasb.com या संकेतस्थळाला भेट द्या.
Latest Marathi News | Baking Course 04 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं