Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा

Business Idea | जर तुम्ही गृहिणी आहात आणि घरबसल्या काम शोधत असाल तर, ही बातमी केवळ तुमच्यासाठी. बऱ्याच गृहिणींना स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचं असतं. आपल्या स्किल आणखीन डेव्हलप करून त्या माध्यमातून पैसे देखील कमवायचे असतात. परंतु घर आणि संसार सांभाळताना त्यांच्या नाकी नऊ येतात. मला सुद्धा घरबसल्या पैसे कमावण्याची जिद्द असेल तर, ही बातमी केवळ तुमच्यासाठी.
घरगुती लोणचं – स्वतःच ब्रँड बनवा :
बहुतांश गृहिणींच्या हाताला चांगलीच चव असते. काही महिला चटण्या किंवा लोणचं अतिशय रुचकर आणि चवदार बनवतात. तुम्ही घरगुती लोणचं बनवण्याचा बिझनेस देखील सुरू करू शकता. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचा प्रचार देखील करू शकता.
शिवणकाम :
बहुतांश गृहिणींना शिवणकाम बऱ्यापैकी येते. त्यामुळे केवळ घरामधील फाटलेली आणि उसवलेली कपडे शिवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम डिझायनर बनू शकता. सध्या मार्केटमध्ये विविध एम्ब्रोईडरी त्याचबरोबर नवनवीन नक्षीकामांच्या डिझाईनचे कपडे जास्त प्रमाणात खरेदी आणि विक्री केले जातात. तुम्ही तुमची एक नवीन ओळख आणि डिझाईन तयार करून शिवणकामचा बिजनेस सुरू करू शकता. तुमचा बिजनेस चालला नाही तर, तुम्ही शिवणकाम शिकवणीचे क्लासेस देखील घेऊ शकता.
योगा ट्रेनर :
बहुतांश महिलांना फिट आणि तंदुरुस्त राहायला आवडते. दररोज आणि नियमित व्यायाम करणाऱ्या महिलांना घरगुती बिजनेस सुरु करायचं असेल तर, ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही एक छोटीशी जागा खरेदी करून किंवा एखाद्या बालकणीमध्ये आणि टेरेसमध्ये दहा जणांच्या बॅचचा योगा क्लास देखील उघडू शकता. सध्याच्या फास्ट फूड काळात महिलांचे वजन प्रचंड प्रमाणात वाढलेले पाहायला मिळते. अशावेळी तुम्ही एक उत्तम योगा ट्रेनर म्हणून क्लासेस घेऊ शकता आणि या माध्यमातून पैसे देखील कमवू शकता.
हस्तकला :
बऱ्याच महिलांचा हस्तकलेमध्ये चांगला हात बसलेला असतो. सध्या नथ मेकिंग आणि ज्वेलरी मेकिंग ती हस्तकला प्रचंड प्रमाणात ट्रेंडिंग आहे. तुम्हीही हस्तकला शिकून शिकवणीचे क्लासेस सुरू करू शकता. कारण की हस्तकलेच्या वस्तूंना बाजारात कायम उत्तम मागणी असलेली पाहायला मिळते. यामध्ये तुम्ही शोभेच्या विविध वस्तू, वॉल हैंगिंग त्याचबरोबर इतरही शोभेच्या रंगीबेरंगी वस्तू बनवून विकू शकता. दरम्यान तुम्ही गिफ्ट हॅम्पर देखील तयार करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Business Idea Monday 30 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं