Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News

Business Idea | प्रत्येक व्यक्ती नोकरी पेशातून व्यवसायातून किंवा आणखीन एखाद्या उद्योगधंद्यातून पैसे कमवत असतो. दरम्यान सध्याच्या काळात बहुतांश व्यक्ती नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त लक्ष देतात. अनेकजण स्वतःच्या व्यवसायाला तर सुरुवात करतात परंतु काही शुल्लक चुकांमुळे मोठ्या गोत्यात सापडतात. या कारणामुळे भविष्यातील मोठ मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.
सध्याची तरुण पिढी व्यवसायिक आणि आर्थिकदृष्ट्या काय उत्तम शिक्षण घेऊन काय उद्योगधंद्यांमध्ये रुजू होतात. परंतु व्यवसायात भरपूर मोठा नफा कमवून सुद्धा छोट्या चुकांमुळे त्यांना पश्चाताप सहन करावा लागतो. तुम्ही सुद्धा स्वतःचा बिझनेस सुरू करत असाल तर, ही चूक कधीही करू नका.
टॅक्सभरताना घ्या विशेष काळजी :
तुम्ही नुकताच बिझनेस स्टार्टअप केलं असेल तर, व्यवसायासंबंधीची ही एक गोष्ट तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. ती म्हणजे वेळेवर कर भरणे. समजा तुम्ही वेळेवर कर भरला नाही तर, तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाते. याचा थेट परिणाम तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावरही होतो.
नाव, लोगो आणि ट्रेडमार्क :
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ट्रेडमार्क, व्यवसायाचे नाव आणि लोगो सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे. बऱ्याचदा काही व्यक्ती दुसऱ्याच्या बिजनेसचे नाव आणि लोगो हुबेहूब वापरतात. परंतु असं करणं अत्यंत चुकीचं आहे. अशा परिस्थितीत नोंदणीकृत नाव आणि लोगो असणारी कंपनी तुमच्यावर कायदेशीररित्या कारवाई करू शकते. त्यामुळे विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अवैध व्यवसाय :
तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याचदा अवैध व्यवसायांच्या फसवणुकीबद्दल ऐकले असेल. अवैध व्यवसाय करणे अत्यंत चुकीचे आहे. या कारणामुळे तुमच्या संपूर्ण भविष्यावर मोठा परिणाम. तुम्हाला पुन्हा व्यवसाय करण्याचा चान्स मिळू शकत नाही. त्याचबरोबर तुमच्यावर कठोर कारवाई देखील केली जाऊ शकते. कायद्याच्या कक्ष बाहेर काम करणाऱ्या व्यक्तीला कठोर कारवाई मिळतेच. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन सर्व गोष्टी पडताळून पहा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Business Idea Tips 04 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं