Lijjat Papad | 40 रुपयांपासून सुरू झालेल्या या लघुउद्योगाने गाठले कोटींचे घर; 'या' 7 महिलांनी तयार केला 'लिज्जत पापड ब्रँड'

Lijjat Papad | 1959 च्या काळात केवळ पुरुष घराबाहेर पडून पैसे कमवायचे आणि महिला केवळ चूल आणि मूल या दोनच गोष्टींपर्यंत मर्यादित राहायच्या. अशातच तुम्ही लिज्जत पापड हे नाव आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल. तुमच्यापैकी अनेकांच्या घरात लिज्जत पापड मोठ्या आवडीने आणि चवीने खाडे पसंत देखील करत असतील. परंतु तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे की, हाच लिज्जत पापड ब्रँड बनवण्यासाठी 1959 काळी एकूण 7 महिलांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना या 7 गुजराती महिलांची कहानी ठाऊक असेल. केवळ 7 महिलांमुळे लिज्जत पापडाने मोठा इतिहास रचला आहे. आज लिज्जत पापडाची संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. सध्याच्या घडीला लिज्जत पापड हा एक ब्रँड बनून फास्ट कंज्यूमर प्रॉडक्ट बनला आहे.
इतिहास जाणून घ्या :
लिज्जत पापड ब्रँड आता कोटींच्या घरात कमाई करत जरी असला तरीसुद्धा त्याची सुरुवात अवघ्या 40 रुपयांपासून सुरू झाली आहे. गुजरातच्या एकूण 7 महिला ज्यांची नावे जसवंतीबेन जमनादास पोपट, उमजाबेन नरनदास कुंडालिया, पार्वतीबेन रामदास थोडानी, भानूबेन एन.टण्णा, दिवालीबेन लुक्का, लागूबेन अमृतलाल गोकणी, जयाबेन व्ही. विथालानी या सात महिलांनी मिळून घराच्या गच्चीवर या छोट्या पापडांचा बिजनेस सुरू केला होता. सध्या लिज्जत पापड प्रोडक्शन अंतर्गत लाखो महिला रोजगार घेत आहेत.
एकूण 25 देशांत होते लिज्जत पापडचे उत्पादन :
महिलांनी हळूहळू करून या बिझनेसला एक नवीन चालना दिली. सर्वप्रथम त्यांनी भुलेश्वर येथे पापड विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर 7 ऐवजी 25 महिला या समूहाची जोडल्या गेल्या. त्यानंतर हळूहळू त्यांचा बिजनेस वाढत गेला.
या सर्व महिलांनी लिज्जत पापडाची सर्वात पहिली शाखा 1968 साली वालोड येथे उघडली. महिलांच्या लिज्जत पापड या उत्पादनाला चांगली निर्यात आल्यानंतर खाकरा, मसाला पापड त्याचबरोबर बेकरी संबंधितचे इतरही उत्पादने तयार करून विकायला लागेल. सध्याच्या घडीला लिज्जत पापडाच्या 17 राज्यांमध्ये 82 शाखा उपलब्ध आहेत. जपान, अमेरिका, साऊथ आफ्रिका यांसारख्या एकूण 25 देशांमध्ये उत्पादन निर्यात केले जाते. या उद्योगाच्या निर्मात्या जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्काराने सरकारकडून गौरविण्यात आले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Lijjat Papad Saturday 07 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं