BHR घोटाळा | जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत वाढ | अजून काही संशयित रडारवर

जळगाव, १० जुलै | बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. याप्रकरणात अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता.
त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवली होती. परंतु दोघेजण पोलिसांना मागील सात महिन्यापासून गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदूरमधून अटक केली होती.
कंडारेला न्यायालयात कोर्टात हजर केले असता सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जितेंद्र कंडारेला पोलीस कोठडी मिळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर पोलीस कोठडीत असताना जळगाव येथील मुख्य शाखेच्या कार्यालयातील तर घरातून अडीच हजार फायलिंग पैकी पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 25 फाईली कंडारेने पोलिसांना काढून दिल्या आहेत. या फाईलीमधून तपासाच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण धागे मिळाले आहेत. दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BHR Scam Jitendra Kandare remanded in custody for more 3 days news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं