भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात

मुंबई, ०६ सप्टेंबर | भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. मात्र काही वेळातच ईडी कार्यालयात कागदपत्र देऊन गोरे आणि निंबाळकर हे बाहेर पडले आहे. बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. नेमकं कोणत्या कारणासाठी ते ईडी कार्यालयात आले होते, याची अद्यापही माहिती मिळू शकली नाही.
भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात – BJP MLA Jai Kumar Gore and MP Ranjit Singh Nimbalkar in the ED office Mumbai :
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीकडून चौकशांचे सत्र सुरू आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर अनिल परबांच्या मागे देखील ईडीची पिडा लागली आहे. दरम्यान अनिल परब यांचे निगटवर्तीय मानले जाणार बजरंग खरमाटे यांच्या देखील ईडीकडून नोटीस बजावण्यता आली आहे. यामुळे आता अनिल परबांच्या अडचणी वाढणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू असल्याचे मानले जाते. खरमाटे हे आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी आहेत. त्यांना ईडीकडून आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीने खरमाटे यांना हे पहिलेच समन्स बजावले आहे. गेल्या आठवड्यामध्ये अनिल परब यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते या चौकशीसाठी हजर झाले नव्हते. यानंतर आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: BJP MLA Jai Kumar Gore and MP Ranjit Singh Nimbalkar in the ED office Mumbai.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं