खा. मोहन डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या माजी आमदाराचं नाव | राज्य सरकार चौकशी करणार

मुंबई, २४ फेब्रुवारी: दोन दिवसांपूर्वी दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. यासोबतच पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी अनिल देशमुख म्हणाले की, जो व्यक्ती सात वेळा खासदार म्हणून निवडून येतो, अशा व्यक्तीने आत्महत्या केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होतात. डेलकर यांनी मुंबईतच येऊन आत्महत्या केली यामागे काय कारण असेल? तसेच त्यांनी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणी जबाबदार आहे का? दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे जबाबदार आहेत का? त्यांच्या दबावाखाली आत्महता केली का? प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का? प्रफुल्ल पटेल यांचा प्रशासनावर दबाव होता म्हणून मुंबईत आत्महत्या केली का? तिथे न्याय मिळणार नाही म्हणून मुंबईत आत्महत्या केली का?, असे अनेक सवाल उपस्थित होतात. मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, असे देशमुख म्हणाले.
दरम्यान, दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिल जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी आपल्या 16 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत तपास करण्याची मागणी केली.
News English Summary: Many questions are being raised after the suicide of Dadra Nagar Haveli MP Mohan Delkar. Delkar had earlier complained of harassment by local BJP leaders. Former BJP MLA Praful Patel’s name has been mentioned by Delkar in his 16-page suicide note, claimed Congress spokesperson Sachin Sawant. Sachin Sawant called on Home Minister Anil Deshmukh and demanded an inquiry.
News English Title: Former BJP MLA Praful Patel name has been mentioned by MP Mohan Delkar suicide note said Sachin Sawant news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं