महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | सोशल मोडियावरील लाईक्ससाठी महिलेचा अल्पवयीन मुलासोबत अश्लील डान्स | महिला आयोगाकडून दखल
एका महिलेने केवळ समाज माध्यमांवर लाईक्स मिळावे, चर्चा व्हावी यासाठी आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासली आहे. आपले फॉर्लवर्स वाढविण्यासाठी या महिलेनं केलेला तमाशा नेटीझन्सला अजिबात आवडला नाही. अनेकांनी या महिलेला ट्रोल केलंय. तर, महिला आयोगाने या महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
NSO फक्त सरकारलाच स्पायवेअर विकतात | नेते, निवडणूक आयुक्त, न्यायाधीश अनेकजण रडारवर होते | धक्कादायक खुलासे
जगभरातील सरकारांकडून आपल्या नागरिकांवर पाळत ठेवल्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या १६ मीडिया संस्थांच्या संयुक्त ‘पेगासस प्रोजेक्ट’ अंतर्गत सोमवारी आणखी एक मोठा खुलासा झाला. ‘द गार्डियन’ व ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह अनेक मीडिया पोर्टलवर जारी यादीत या स्पायवेअरच्या निशाण्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, त्यांचे ५ जवळचे मित्र, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, प. बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी व माजी सरन्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी महिलाही हाेती. इतकेच नव्हे तर सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळानंतर स्पष्टीकरण देणारे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि त्यांच्या पत्नीचेही नाव यादीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात दोन साधूंना जमावाकडून बेदम मारहाण | अर्णब गोस्वामी आणि भाजप शांत
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील पालघर मध्ये साधूंना झालेल्या मारहाणीत राज्यातील भाजपने आणि अर्णब गोस्वामी यांनी मोठा हंगामा केला होता. मात्र आता भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात साधूवर जमावाने हल्ला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोर्नोग्राफिक प्रकरणात सहभागाचा संशय | शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा हा अडचणीत सापडला आहे. गुन्हेशाखेने पोर्नोग्राफिक फिल्मस आणि हे फिल्म काही अॅपमधून प्रदर्शित केल्याबद्दल त्याला अटक केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफिक फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याचं वृत्त चुकीचं | सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ED समोर चौकशीला जाणार
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारी देखील त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली होती. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
Pegasus हॅकिंग प्रकरण | तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे - राहुल गांधी
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर होत असलेल्या या अधिवेशनात २० बैठका होतील. अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात सरकार १७ नवीन विधेयके आणणार असून ती मंजूर करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे, विरोधकही कोरोना, शेतकरी आणि संरक्षण सेवांमध्ये संपाला गुन्हा जाहीर करण्यासंबंधी अध्यादेशावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मोदी सरकारमधील मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप | भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ
देशातील मोदी सरकारमधील काही मंत्री, RSS, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात असल्याचा धक्कादायक दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. सुब्रमण्यम यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | करीना कपूरच्या विवादित 'प्रेग्नेंसी बायबल’ संदर्भात कायदेतज्ज्ञ काय सांगतात?
बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करीनाने तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच नावं ‘प्रेग्नेंसी बायबल’ असे आहे. करीना या पुस्तकाच्या नावामुळे आणि त्यात सांगितलेल्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. मी एक चांगली आई आहे हे सिद्ध करण्यासाठी काय करायची गरजं नाही हे करीनाने पुस्तकात सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | आरोपपत्र दाखल झाले नसल्याचे कारण देत सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज
अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाजे यांना अटक केल्यानंतर 90 दिवसात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. याचाचा आधार घेत वाझेनी आता जामिनासाठी अर्ज केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोठी कारवाई | अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
संगीत क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी नोंदवलेल्या जबाबामुळे संजय राठोड यांना मोठा दिलासा | जबाबात काय?
राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागलेलं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या मिटण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे पूजाच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदवलेला जबाब. कारण, आमची कोणा विरोधात काही तक्रार नसल्याचा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पोलिसांकडे नोंदविला आहे. अशी माहिती झोन पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. तर, यामुळे शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुन्हा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ | शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदनगर मध्ये एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान या प्रकरणी भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | परमबीर सिंह यांच्याविरोधात मुक्त चौकशीचे ACB'ला राज्य सरकारकडून आदेश
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच सिंह यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक गंभीर आरोप कले होते.
4 वर्षांपूर्वी -
वाझेंनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब देशमुख नव्हे तर परमबीर सिंग? | मग संभ्रम पसरवतंय कोण?
मुंबई पोलिस दलातील निलंबित आणि विवादित अधिकारी सचिन वाझे याने सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणात काही आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझे यांनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नाही, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचा आरोप घुमरे यांनी केलाय. अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र ते राहून गेलं. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, असंही घुमरे यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
अधिकाऱ्यांच्या नियुक्तीतून भाजप कर्नाटक सरकारकडून वसुली | मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांमार्फत करोडोची वसुली
महराष्ट्रातील सरकारवर भारतीय जनता पक्षाने वसुली सरकार असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. मात्र आता भाजप मध्ये वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किती मोठी वसुली केली जाते ते समोर आल्याने खळबळ माजली आहे. विशेष महाराष्ट्रात मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केल्यांनतर सीबीआय आणि ईडी वेगाने कामाला लागली होती. त्यासाठी कारण दिलं गेलं की वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप केल्याने प्रकरण गंभीर आहे. मात्र आता कर्नाटकमधील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री येदियुरप्पा नियुक्त्यांच्या बदल्यात त्यांच्या नातेवाइकांमार्फत करोडो रुपयांची वसुली करत होते अशी धक्का दायक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई हायकोर्टाची टीप्पणी, पोलीस प्रशासन प्रमुखही तितकाच जबाबदार | परमबीर सिंग स्वतःच अडकणार?
मुंबईचे पोलीस माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्यावरही CBI चौकशीची टांगती तलवार असणार आहे. तसेच राज्य सरकारच्या तपास यंत्रणा देखील त्यांना अटक करू शकण्याच्या शंकेने केंद्रीय तपास यंत्रणा देखील आधीच कार्यरत झाल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मंत्रिमंडळातील 42% मंत्र्यांविरुद्ध गंभीर गुन्हेगारी खटले | नवे गृह राज्यमंत्री तर हत्येतील आरोपी - ADR रिपोर्ट
मोदी सर्वच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता तर आहेच, पण त्याहून अधिक बदनामी होण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. कारण मोदींसोबत कशा प्रकारचे नेते निवडले गेले आहेत आणि त्याचं फलित काय मिळणार याचा देखील अंदाज येऊ शकतो. साधी नोकरी करणाऱ्या सामान्य माणसाला नोकरी देताना देखील मालक चौकशी करून नेमणूक करतो. पण मोदी शहा यांनी देश कशा लोकांच्या हातात दिला आहे याचा देखील अंदाज येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
SBI बँकेतील ४४ कोटी अकाउंट धोक्यात? | चिनी हॅकर्स'कडून हे तंत्र वापरलं जातंय - वाचा सविस्तर
देशातील 44 कोटी ग्राहक असणारी बँक आणि त्याचे खातेदार संकटात आहेत. या खात्यावर चीनी हॅकर्सची नजर आहे. चिनी हॅकर्स एसबीआय खाती हॅक करत पैसे काढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्स फिशिंग मेलद्वारे बँक वापरकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर, हे हॅकर्स फिशिंग घोटाळ्यांद्वारे बँक वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. हॅकर्स खातेदारांना खास वेबसाइट लिंकचा वापर करुन केवायसी अपडेट करण्यास सांगत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत वाढ | अजून काही संशयित रडारवर
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. याप्रकरणात अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता.
4 वर्षांपूर्वी