महत्वाच्या बातम्या
-
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या आईचा खून करून काळीज काढणाऱ्या नराधमास फाशी
दारूसाठी पैसे दिले नाहीत या रागाच्या भरात जन्मदात्या आईला ठार मारून तिचे काळीज काढणाऱ्या निर्दयी नराधमास गुरुवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सुनील कुचकोरवी असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कोल्हापुरात कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत २८ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. यल्लव्वा रामा कुचकोरवी असे मृत वृद्धेचे नाव होते. हल्लेखोर मुलगा सुनीलला याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. जन्मदात्या आईला क्रूरपणे मारणाऱ्या कुचकोरवी खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड 2018 | फडणवीसांच्या काळातील सर्वात मोठ्या शासकीय धान्य घोटाळ्यात CID नंतर ED'ची उडी
फडणवीसांच्या काळातील म्हणजे 2018 च्या जुलै मध्ये राज्यातील सर्वात मोठा शासकीय धान्य घोटाळा नांदेडमध्ये उघड झाला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या धान्य घोटाळ्यात जिल्ह्य़ातील बडे राजकीय मंडळी, व्यापारी आणि महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हाथ असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणारे मोठे रॅकेट नांदेडमध्ये कार्यरत असल्याचे यात उघड झालं. पोलीसांनी या कारवाईत दहा ट्रकसह एक कोटी 80 लाखांचे धान्य जप्त करुन गुन्हे दाखल केले होते. या धान्य घोटाळ्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की पारदर्शक चौकशी झाली तर अनेक बडी मासे तुरुंगात जातील अशी माहिती प्रसार माध्यमांना मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळाप्रकणी घडामोडींना वेग | महाजन आणि फडणवीसांचे निकटवर्तीय आ. चंदुभाई पटेल अटकेच्या भीतीने अंडरग्राउंड?
बीएचआर घोटाळ्याप्रकरणी एका बड्या नेत्याला अटक होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून आ.पटेल यांचा शोध सुरू असल्याचे समजते. आ.चंदूभाई पटेल यांच्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा देखील दाखल केल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले
पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मनसेचे आमदार राजू पाटील यांना ईडीचे समन्स | नेमकं काय आहे प्रकरण? - वाचा सविस्तर
ईडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटलांना त्यांच्या जबाब नोंदविण्यासाठी 23 जून रोजी समन्स बजावला होता. ते जबाब देऊन आले आहेत. ते आज मुंबईत कामानिमित्त गेले असता आता या प्रकरणी त्यांची काही गरज आहे का? हे विचारण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली. पण ईडीच्या कार्यालयातील राजू पाटील यांच्या जाण्याने राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी'कडून अटक
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजेश साप्ते आत्महत्या | त्या फिल्म संघटनेच्या खंडणीखोर आरोपी पदाधिकाऱ्यांचे भाजप नेत्यांशी घनिष्ट संबंध?
कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय भूकंप! | राफेल घोटाळ्यावरून फ्रान्सच्या आजी-माजी पंतप्रधानांची चौकशी होणार | मोदी सरकारही अडचणीत?
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख दिल्लीला रवाना | ईडीच्या नोटिशीविषयी कायदेशीर सल्ला घेण्याची शक्यता
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीस गैरहजर राहण्यासाठी अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | ईसीआयआरची प्रत देण्याची विनंती
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात आपले वाढते वय आणि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट मिळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.
4 वर्षांपूर्वी -
BHR घोटाळा | जितेंद्र कंडारेला अखेर इंदूरमधून अटक | बडे मासे गळाला लागणार
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील इंदूर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. दाढी, मिशी वाढवून रूप बदलवण्याचा प्रयत्न करूनही इंदूर परिसरातील एका जुनाट वसतिगृहाजवळ त्याला ओळखून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो जिथे राहत होता तिथे काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली असून त्यांच्यासह बुधवारी त्याला पुण्याच्या विशेष न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स | आज चौकशीसाठी राहणार हजर
ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार आहे. 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
नाबार्ड दक्षता पथकाच्या चौकशीत मुंबै बँकतील बोगस कर्ज प्रकरणं समोर | दरेकरांच्या अडचणीत वाढ
मुंबै बँकमध्ये बोगस कर्ज प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. नाबार्डच्या आदेशावरून बॅंकेच्या दक्षता पथकाच्या चौकशीत समोर बोगस कर्जाचं प्रकरण समोर आल्याचं बोललं जातं आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व राजकारण असून सत्ताधाऱ्यांकडून द्वेषापोटी हे सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाझेची अनावश्यक मालमत्ता प्रकरणी महाराष्ट्र एसीबीकडून चौकशी सुरु | वाझेच्या खात्यात आढळले दीड कोटी
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेमुदत मालमत्ता प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. एसीबीच्या महासंचालकांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एसीबी सचिन वाझेची जंगम आणि स्थावर मालमत्ता प्रकरणी चौकशी करत असून मालमत्तेच्या स्त्रोतांची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. सचिन वाझेला एनआयएने गेल्या मार्च महिन्यात अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांच्या प्राथमिक चौकशीचे CBI'ला हायकोर्टाचे आदेश होते | ED'ला मध्ये आणून अटकेची टांगती तलवार?
100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीने अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहायचं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकरवी 100 कोटी रुपयांची वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप आहे. यानंतर कोर्टाच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
ACB सचिन वांझेची खुली चौकशी करणार | कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याच्या २ तक्रारी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटके सापडली होती. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास अटक केली होती. या दरम्यान सचिन वाझे याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आात राज्याच्या लाचलुचपत विभागाकडून सचिन वाझे याची खुली चौकशी केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीने काल DCP डॉ. राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला | आज अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी | काय कारण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका | 9371 कोटींची संपत्ती जप्त
भारतात बँकिंग घोटाळ्याच्या घटनांमध्ये सरकारी कारवाईचे परिणाम दिसून येत आहेत. अंमलबजावणी संचालनालयने बँकिंग घोटाळ्याचे फरार आरोपी विजय मल्या, मेहूल चौक्सी आणि नीरव मोदीची एकून 9371 कोटींची संपत्ती सरकारी बँका आणि केंद्र सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आली आहे. ईडीने ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अविनाश भोसलेंवरील ED कारवाई हा अजित पवारांवर दबाव | ED भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी हे करतय - अंजली दमानिया
अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भाजपा किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ईडी कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,” अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी