महत्वाच्या बातम्या
-
केवळ प्रामाणिक पत्रकारांना छळलं जातंय | मनदीप पुनिया यांच्या पत्नीचा आरोप
शेतकरी आंदोलनाची जनपथ या संकेतस्थळावर सलग दोन महिने माहिती देणाऱ्या स्वतंत्र पत्रकार मनदीप पुनिया यांना ३१ जानेवारी रोजी दुपारी १-दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतसुनावत थेट तिहार तुरुंगात पाठविण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
कुणाल कामराकडून प्रतिज्ञापत्रामार्फत सुप्रीम कोर्टालाच लोकशाहीच्या मूलतत्त्वांचा धडा
कोर्टाच्या अवमानप्रकारणी खटला सुरु असणाऱ्या स्टँडअप कॉमेडी कलाकार कुणाल कामरा याने आपल्या समर्थनार्थ कोर्टात आपली बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. मी केलेली ट्विट्स देशातील लोकांचा आपल्या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास ढळावा या उद्देशाने केला नव्हती. आपल्या ट्विट्समुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली कोर्टाची पाळेमुळे हादरतील असं म्हणणं माझ्या क्षमतेला गरजेपेक्षा जास्त समजणं असल्याची’ उपहासपूर्ण मात्र ठाम टिपण्णी या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांवर FIR | आणि उपद्रव माजवणाऱ्यांना केलं फरार | आप'चं टीकास्त्र
दिल्लीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला होता. यावेळी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठा हिंसाचार झाला. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरुन रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख | अखेर दुरुस्त
रावेर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केलेला स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून भाजपला चूक सुधारण्यास सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना भडकावणारा दीप सिद्धू भाजपा कार्यकर्ता | पंतप्रधानांबरोबर फोटो | शेतकरी आक्रमक
मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शेतकऱ्यांचा संघर्ष हिंसक | पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हॉलिडेसाठी १२ हजार डॉलर आणि ४० लाख फिक्सिंगसाठी दिले | पार्थो दासगुप्तांचा कबुलनामा
बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना लिखित स्वरूपात दिलेल्या काबुलनाम्यात अनेक धक्कादायक गोष्टी मान्य केल्या आहेत. त्यामध्ये विदेशात सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी १२ हजार डॉलर आणि TRP रेटिंग फिक्सिंगसाठी वेगळे ४० लाख रुपये दिल्याचं मान्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींनी मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले - आ. भाई जगताप
अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ट्रॅक्टर रॅलीमध्ये शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट उधळला
देशाची राजधानी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आगामी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) ट्रॅक्टर मार्चचं आयोजन करणार आहेत. मात्र, या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपात करण्याचा कट होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. शेतकऱ्यांनी संबंधित आरोपीला पकडून पत्रकार परिषदेतच बोलतं केलंय. आरोपीनेही या षडयंत्राची धक्कादायक कबुली दिलीय.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक डाटा चोरी प्रकरण | केम्ब्रिज अॅनालिटिका विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
देशात खळबळ माजविणाऱ्या फेसबुक डाटा चोरी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वतःकडे घेतलाय. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून युनायटेड किंगडमच्या ‘केम्ब्रिज अॅनालिटिका’ या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक युझर्सचा डाटा चोरी करण्याच्या आरोपासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अॅड. रमेश त्रिपाठींनी रेणू शर्मांची केस सोडली | तर सोमैयांना राजकीय उतावळेपणा अंगलट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश | त्या सुंदर अभिनेत्रीचं नाव आल्यानं खळबळ...
मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल ‘कास्टिंग काऊच’ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट प्रेम उर्फ संदीप इंगळे असं या निर्मात्याचं नाव असून, अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने सुरू असल्याचं समजलं. त्यामुळं सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशद्रोही अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा | राष्ट्रवादीचं मुंबईत आंदोलन
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली.
4 वर्षांपूर्वी -
TRP scam | पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार घेतंय कायदेशीर सल्ला | अर्णब गोस्वामी यांना अटक होणार?
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग थांबवा | IBF सदस्यत्वही रद्द करा | एनबीए'ची मागणी
रिपब्लिकचे सर्वेसेवा अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यानच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णबकडे सिक्रेट लष्करी करीवाईची माहिती कशी | मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची बैठक
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
4 वर्षांपूर्वी -
अर्णबला बालाकोट स्ट्राईकची आधीच माहिती असल्याचं संरक्षण खात्याला माहित होतं का ? | RTI ने प्रश्न
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी