महत्वाच्या बातम्या
-
धनंजय मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा पोलिसांना संशय | सखोल चौकशी सुरु
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा मुंडे परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी करुणा यांना ताब्यात घेतले आहे. चौकशी चालू असल्याचे समजते आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांच्या विरोधात 'ईडी'कडून लूकआऊट नोटीस
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती.
4 वर्षांपूर्वी -
वाझेला पुन्हा नाव कमवायचं होतं | म्हणून त्याच अट्टाहासातून अँटीलिया कट रचला | आरोप पत्र दाखल
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवस्थान असलेल्या ‘अँटीलिया’समोर स्फोटके भरलेली स्कार्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणी सीबीआयच्या वतीने ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात १० हजार पानांचं आरोप पत्र दाखल करण्यात आलं. या आरोप पत्रात प्रामुख्याने या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने उत्तम तपास अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट असल्याचं सिध्द करण्यासाठी अँटीलियासमोर स्फोटकांनी भरलेली स्कर्पिओ गाडी ठेवल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
MP Bhavana Gawali | तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल
शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. तीन तासापासून ईडीची टीम कार्यालयात चौकशी करत आहे. रिसोडनंतर दुसऱ्यांदा ईडीची टीम वाशिम जिल्ह्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलिसांकडून सुटला की आमच्याकडून फुटला | त्याची सर्व बोटं छाटली जातील | राज ठाकरे ठाण्यात
महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट? | CBI नं दिलं स्पष्टीकरण
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात अनिल देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता खुद्द सीबीआयनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केलाय.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद | ऑटो चालक काढत होता छेड, तरुणीची धावत्या रिक्षातून उडी | आरोपीला अटक
औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीची रिक्षाचालकाडून छेडछाड करण्यात आली. आपला जीव वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.
4 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्याची मित्राच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी | संतापलेल्या महिलेने केली बेकार धुलाई
छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या नेत्याने आपल्याच मित्राच्या बायकोला शारीरिक संबंधासाठी गळ घातली आहे. तसा आरोप महिलेने केलाय. यानंतर महिलेने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची चांगलीच धुलाई केली. परंतु, या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याने दुसऱ्या दिवशी महिलेला तसेच तिच्या मैत्रिणीला केसांना धरून मारलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड आणि मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची विभागीय चौकशी | हे आहे धक्कादायक कारण
मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे, जे अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड होते, त्यांची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बदली केली आहे. अमिताभ बच्चन जितेंद्रला वार्षिक 1.5 कोटी रुपये देत होते असा आरोप आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जितेंद्रच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह त्यांच्या जावयाची मालमत्ता ईडी'कडून जप्त
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसलाय. ईडीने गुरुवारी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी तर शुक्रवारी खडसेंची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. एएनआयने आणि काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस | विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक
विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बनारसच्या भेलूपूर भागात राहणाऱ्या अरुण पाठक यांनी फेसबुक आणि ट्विटरवर नारायण राणेंविरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्टही केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई | गजानन काळेंवर 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. पत्नी संजीवनी काळे यांनी गजानन काळेंविरोधात विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होमगार्ड महत्वाचे | तरी होमगार्ड डीजी परमबीर सिंग गायब?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीसंदर्भात आरोप लावून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या मोठ्या सुटीवर गेले असून अजुनही ते कामावर हजर न झाल्याने आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या प्रकरणी ईडीकडून देशमुखांविरोधात फास आवळला जात असतानाच परमबीर सिंग यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरत आहे हे येथे उल्लेखनीय.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रपूर | जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण
जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. ही संतापजनक घटना दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे शनिवारी घडली. यात पाच जण जबर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे न्यायालयाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | अटक अटळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झालीय.
4 वर्षांपूर्वी -
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल | व्यापाऱ्याकडून ९ लाख खंडणी आणि महागडे फोन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये ऑडीओ क्लिप बॉम्ब | तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा | तो लोकप्रतिनिधी?
लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले”, असं हृदयाला बोचणारे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Param Bir Singh | होमगार्ड्स बदली पासून रजेवर | आता फोन बंद | ठाणे पोलीस पुढच्या तयारीला...
ठाणे पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर ५ दिवसांनी, सूत्रांनी सीएनएन न्युज18 ‘ला ते चंदीगड येथील त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in Supreme Court | अनिल देशमुखांची ED बाबतीतली याचिका सुप्रीम कोर्टाकडून स्विकृत
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. याबाबत अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयात आपण चौकशीसाठी उपस्थित राहू, असे पत्र अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केल आहे.
4 वर्षांपूर्वी