TRP scam | पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

मुंबई, १९ जानेवारी: बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार आहे.
टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता.
Maharashtra: Mumbai Sessions Court rejects bail plea of former BARC CEO Partho Dasgupta who is an accused in the TRP scam.
— ANI (@ANI) January 20, 2021
तत्पूर्वी मुंबई येथील मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयाने पार्थो दासगुप्ताला २८ डिसेंबर, २०२० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, नंतर ती ३० डिसेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आणि त्यानुसार न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता जो न्यायालयाने फेटाळला.
News English Summary: Partho Dasgupta, former CEO of Broadcast Audience Research Council (BARC), accused in the notorious TRP scam, has had his bail application rejected by a sessions court in Mumbai. This will increase Dasgupta’s stay in jail.
News English Title: TRP scam Partho Dasgupta bail application rejected by a sessions court in Mumbai news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं